पावसामुळे शेतातील पिकात सापाचा वावर
सावधानता ! बाळगण्याचे एम एच २९ हेल्पिंग हँड्स संस्थेचे आवाहन …!
वणी (तरोडा) : या वर्षी शेतपिकाला योग्य पाऊस झाल्याने पिकाची वाढ जोमाने होत असल्याने अशा पोषक वातावरणात शेतात सापाचा मुक्त वावर मोठया प्रमाणात असतो अशा वेळी शेतात कामे करताना शेतकरी शेतमजुरांनी दक्षता बाळगणे अत्यंत गरजचे आहे असे आवाहन एम एच २९ हेल्पिंग हँड्स संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सर्पमित्र निलेश मेश्राम यांनी समस्त शेतकरी शेतमजुरांना केले आहे. जिल्ह्यात संततधार पाऊस सुरु असून शेतमाल झपाट्याने वाढत असल्याने साप, इंगुळ, विंचू यांना वावरण्याचा व राहण्यासाठी योग्य जागा मिळते मात्र शेतात काम करताना पिकामुळे अशा सरपटणारे प्राणी नजरेत पडत नाही त्यामुळे चुकीने सापावर पाय पडल्यास आपला बचाव करण्यासाठी दंश करू शकतो यासाठी काम करताना दक्षता घेऊन काठीने काम करण्याठिकाणी

पिकाखाली सरपटणारा प्राणी आहे का अशी खात्री करूनच कामे करावी असे आवाहन एम एच २९ हेल्पिंग हँड्स संस्थेचे संस्थापक सर्पमित्र निलेश मेश्राम यांनी केले आहे. कामे करताना पायात जाड व लांब बुट वापरावे, काठी आदळत कामे सुरू करावे, पिकात साप आढळल्यास त्याला मारू नये, त्याला पकडण्यासाठी सर्पमित्राला बोलवून त्यां पकडलेल्या सापाना दुर वनक्षेत्रात सोडून द्यावे व सापाविषयी कुठलेही भिती बाळगु नये, चुकीने सर्पदंश झाल्यास तातडीने दवाखाण्यात जाऊन उपचार घ्यावे असे आवाहन प्रसिद्ध सर्पमित्र वणी टीम अनिकेत कुमरे, राजु भोगेकर, रमेश भादिकर, समीर गुरनूले, नितीन माणूसमारे, रवि नन्नावारे, आशिष सोनटके, सुमित गौरकार, कुणाल कुमरे यांनी केले आहे.
निलेश मेश्राम यवतमाळ
हेल्पिंग नंबर. 9850577616
राजु भोगेकर वणी (तरोडा)
हेल्पिंग नंबर. 9130020650










