उड्डाणपुलाचे कासवगतीने चालणारे काम घुग्घूस वासियासाठी ठरतोय शाप
घुग्घूस : चंद्रपूर वणी मार्गांवर राजीव रतन चौक येथील रेल्वे क्रॉसिंग गेट क्रं 39 हा दिवसात जवळपास पंधरा ते वीस वेळा बंद पडत असतो याठिकाणी गेल्या तीन वर्षांपासून आर. के. मदानी या कंपनीच्या वतीने रेल्वे उड्डाणपुलाचे कार्य शुरु आहे हे काम कासव गतीने शुरु असल्यामुळे वेकोलीच्या रामनगर, गांधी नगर, सुभाष नगर व अन्य कॉलनीत राहणाऱ्या नागरिकांचे जीवन नरकीय झालेले आहेत. वस्ती आणि कॉलनीला जोडणारा लोखंडी पूल बंद असल्याने दुचाकी वाहन धारकांना या रस्त्या शिवाय दुसरा पर्यायच उरलेला नाही या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत सर्वत्र महाभयंकर चिखल पसरले आहेत यावर नागरिक घसरून पडत आहे शालेय विद्यार्थ्यांना तर प्रचंड त्रास भोगावा लागत आहे. या रस्त्याच्या दुर्दैशे करीता आर के मदानी कंपनीच जवाबदार असून सदर कंपनीवर कारवाई करण्यात यावी तसेच याठिकाणी नागरिकांना चालण्या योग्य रस्ता तात्काळ निर्माण करावे अशी मागणी काँग्रेस नेते सैय्यद अनवर तथा सामाजिक कार्यकर्ते दिपक पेंदोर व नागरिकांनी केली आहे