W.C.L.महाप्रबंधक चंद्रपुर हाईप्राईड च्या कंपनीकडे सुरु असलेला रुग्णवाहिकेचा कंत्राट रद्द करा :
मनसेचे जिल्हासचिव किशोर मडगुलवार
चंद्रपुर:-वेकोली महाकाली कॉलरी चंद्रपूर अंतर्गत रुग्नवाहीका चालक हे कंत्राटी वाहनचालक असून या वाहनचालकांचा कंत्राट सध्यास्थितीत हाईप्राईड या कंपणीकडे आहे मात्र या कंपणीच्या कंत्राटदाराने सदर वाहनचालकांना नियमीत मासीक वेतन देत नसून या रुग्णवाहिका चालकांनवर उपासमारीची वेळ आली आहे मागील काही दिवसांपासून या वाहन चालकांचे वेतन रखडले असून यांच्यावर कुंटुबाचे उदनिर्वाह कसे करायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे हाईप्राईड या कंपनीचे कंत्राटदार जाणीवपूर्वक या रुग्णवाहिका चालकांच्या वेतनाकडे दुर्लक्ष करीत असून यावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे तेव्हा आपण आपल्या स्तरावर योग्य ती चौकशी करून हाईप्राईड या कंपणीचे कंत्राट तात्काळ रद्द करून या रुग्ण वाहनचालकांना दिलासा द्यावा या आशयाचे निवेदन डब्लु सि एलच्या जनरल मॅनेजर यांना देशात आले असून आठ दिवसाचे आत कोणतीहि कार्यवाही न झाल्यास मनसेकडून तीव्र आंदोलन करण्यात येणार आणि याला सर्वस्वी संबधीत प्रशासन जबाबदार असेल या आशयाचे निवेदन मनसेचे जिल्हा सचिव किशोर मडगुलवार व मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदिप चंदनखेडे रुग्ण मित्र क्रिष्णा गुप्ता राजु देवागण जावेद पटाण महेन्द्र कामपेल्ली संदीप मेश्राम यांनी दिले असून निवेदन देणार्या शिष्टमंडळात मनसेचे पदाधिकारी व मनसैनिक अणि रुग्ण वाहिका चालक प्रामुख्याने उपस्थित होते