*गोंडपीपरी तालुक्याततील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माजी अँड संजय धोटे यांनी केली पाहणी*
*कुलथा,फुरडी हेटी,तसेच तारडा गावांना दिल्या भेटी, शेतकऱ्यांच्या समस्या घेतल्या ऐकून*
गोंडपीपरी:- मागील काही दिवसांपासून गोंडपीपरी तालुक्यामध्ये पावसाची संतत धार सुरू आहे.याचा फटका अनेक घरांना तसेच शेतीना बसला असुन घरांच पडझड झाली आहे. दरम्यान आज दिनांक २८ जुलै २०२४ रोजी माजी आमदार अँड संजय धोटे यांनी गोंडपीपरी तालुक्यातील कुलथा,फुरडी हेटी, तसेच तारडा या गावाची भेट देत शेतकरी व गावकऱ्यांशी चर्चा केली,शेतीचे तसेच घराची पडझड झलेल्याचे पंचनामे करून शासनाच्या माध्यमातून नुकसान भरपाई देण्याची याप्रसंगी त्यांनी मागणी केली
यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष बबन निकोडे, भाजपा तालुका महामंत्री रवि पावडे,भाजपा युवा नेते नितीन ढुमने,सरपंच सुधाकर गौरकार,दयाराम कोमटकर,मनोहर निखाडे,नंदू निखाडे,मोरे पाटील,सुरेश पिंपळशेंडे,मुसळे पाटील,सरवर पाटील,कुलथा गावचे दामोदर गिरसावळे,अशोक गौरकार,खुशाब कानकाटे,संतोष गिरसावळे,खुशबराव शिंदे,झाडे पाटील,बाबुराव चौधरी उपस्थित होते.