गडचांदूर येथील दुकानासमोर बॉम्ब सदृश वस्तू ठेवणारे 2 इसमास स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर व गडचांदूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात 

34

गडचांदूर येथील दुकानासमोर बॉम्ब सदृश वस्तू ठेवणारे 2 इसमास स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर व गडचांदूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात

गढचांदूर:
आज दिनांक 30/07/2024 रोजी दुपारी 01/30 वा. चे दरम्यान चंद्रपुर जिल्हात गडचांदूर शहरातील बसस्टॉप चौकातील भगवती NX कापड दूकान समोर बॉम्ब ठेवलेबाबतची माहीती त्या दूकानाचे मालक नामे शिरीष सूर्यकांतराव बोगावार यांना फोनव्दारे मिळाली होती त्यावेळी त्यांनी ठाणेदार पोस्टे गडचांदूर यांना फोनव्दारे माहीती दिले त्याचेवरून त्यांनी पोलीस स्टॉप पाठवून त्याचे दूकानासमोर झडती घेतली असता त्या दुकानाचे समोर एक संशयास्पद बॅग दिसून आली त्यामध्ये दूरून पाहिले असता त्यामध्ये लाईट टिपटिप करीत असल्याचे दिसून आले त्यावरून पोस्टे गडचांदूर ठाणेदार यांनी सदर माहीती मा. पोलीस अधीक्षक सा. यांना देवून त्याचे सल्याने चंद्रपूर येथील बॉम्ब शोध पथक (BDDS) यांना दिली.

सदर घटनेचे गांभीर्य ओळखुन मा. पोलीस अधिक्षक, चंद्रपुर व मा. अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, पोनी. महेश कोंडावार, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर हे स्वता घटनास्थळी तात्काळ हजर झाले तसेच BDDS पथक चंद्रपूर व गडचिरोली यांना पाचारण करण्यात आले व त्याचे सहाय्याने सदर बॉम्ब Defuse करण्याचे काम राबविले. दरम्यान आरोपी शोध कामी गडचांदूर पोलीस स्टॉप व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, उपविभाग गडचांदूर मधील वेगवेगळी पथके तयार करून रवाना करण्यात आली. त्यावेळी घटनास्थळाबाहेरील CCTV फुटेज व कौशल्यपूर्ण व तांत्रिक तपास करून स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर व पोलीस स्टेशन गडचांदूर यांनी 2 संशयीत इसमांना ताब्यात घेवून त्याचेकडे चौकशी केली असता त्यांनी त्याचेवर असलेले कर्जामूळे दूकानदार यांना फोनकरून खंडणी मागण्याचे उद्देशाने सदरचे कृत्य केल्याचे कबूल केले. त्यांनतर BDDS पथक चंद्रपूर व गडचिरोली यांना सदर बॉम्बची Defuse करण्याकामी पाहणी केली असता सदर बॉम्ब हा बनावटी असल्याचे दिसून आले. सदर प्रकरणाबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून पूढील तपास ठाणेदार गडचांदूर हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here