रुग्णांची 54 वी तुकडी शस्त्रक्रियेसाठी रवाना

59

रुग्णांची 54 वी तुकडी शस्त्रक्रियेसाठी रवाना

घुग्घुस शहरातील सुधीरभाऊ मुनगंटीवार आरोग्य सेवा समितीतर्फे रुग्णांची ४४ वी तुकडी विविध आजारांवर शस्त्रक्रियेसाठी शुक्रवार, २ ऑगस्ट रोजी सकाळी ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातून नागपूरला राजुरा विधानसभा निवडणूक प्रमुख देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात व भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या नेतृत्वात रवाना करण्यात आली.

मागील अनेक वर्षांपासून सुधीरभाऊ मुनगंटीवार आरोग्य सेवा समितीच्या माध्यमातून रुग्ण सेवेचे कार्य निरंतर सुरु आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त घुग्घुस येथे भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरात २ हजारांच्या वर रुग्णांची शस्त्रक्रिया करण्यासाठी सांगितले होते त्यातील पहिली ६२ रुग्णांची तुकडी रवाना करण्यात आली. या रुग्णांच्या विविध आजारांवर नि:शुल्क शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, भाजपाचे निरीक्षण तांड्रा, अमोल थेरे, अजय लेंडे, सुनंदा लिहीतकर व मोठया संख्येत रुग्णांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here