घुग्घुस पोलिस ठाण्यासमोरील चौकात हायमास्ट लाईट लावून सौंदर्यीकरण करा- विवेक बोढे
एसीसी सिमेंट प्रशासनाला निवेदनाद्वारे मागणी
घुग्घुस येथील पोलिस ठाण्यासमोरील चौकात एसीसी सिमेंट कंपनीतर्फे हायमास्ट लाईट लावून चौकाचे सौंदर्यीकरण करा अशी मागणी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी कंपनी व्यवस्थापनाला दिलेल्या निवेदनातून केली आहे.
एसीसी सिमेंट कंपनीचे प्रवेश फलक लागलेल्या पोलिस ठाण्यासमोरील चौकात रात्रीच्या सुमारास अतिशय अंधार पसरलेला असतो. त्यामुळे ये-जा करतांना नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. हा चौक घुग्घुस शहरातील मुख्य चौकापैकी एक आहे. एसीसी कंपनीने तयार केलेल्या रेल्वे फाटकाजवळ दोन्ही बाजूने मोठ मोठे खड्डे पडलेले आहे.
या खड्ड्यांमुळे अनेक अपघात घडत असतात त्यामुळे चौकातील रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे आवश्यक आहे. चौकाचे सौंदर्यीकरण करून त्याठिकाणी हायमास्ट लाईट लावणे अत्यंत आवश्यक आहे.
एसीसी सिमेंट कंपनीच्या वाहनांची वाहतूक याच चौकातून होते तसेच शहर वासियांना ही याच चौकातून ये-जा करावे लागते.
ही समस्या लक्षात घेत भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी शिष्टमंडळासह एसीसी कंपनीचे एचआर प्रफुल पाटील यांची भेट घेतली व चर्चा करून निवेदन दिले.
यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, भाजपाचे अमोल थेरे, हेमंत कुमार आदींची उपस्थिती होती.