“भारत बंदला ” काँग्रेसचे समर्थन

33
  1. “भारत बंदला ” काँग्रेसचे समर्थन

एस्सी /एसटी आरक्षण प्रकरण घुग्घूस शहर कळकळीत बंद

घुग्घूस : इंदिरा साहनी प्रकरणात निर्णय देतांना सर्वोच्च न्यायलयाने अनुसूचित जाती (SC ) व अनुसूचित जमाती ( ST )आरक्षणात क्रिमिलेयर तयार करण्याचे निर्देश दिलेले आहेत.
सदर निर्णय हा आरक्षणात वर्गीकरण करणारा व आरक्षण विरोधी असल्याने आरक्षण बचाओ संघर्ष समिती तर्फे 21 ऑगस्ट 2024 रोजी देशभरात भारत बंद पुकारण्यात आले त्याअनुषंगाने घुग्घूस येथे 21 ऑगस्ट रोजी घुग्घूस बौध्द सर्कल समितीच्या वतीने घुग्घूस बंदची हाक देण्यात आली

यात आदिवासी सामाजिक संघटना,काँग्रेस,आप,बसपा, वंचीत बहुजन आघाडी व अन्य सामाजिक व राजकीय संघटना सहभागी झाले

सदर बंदला घुग्घूस काँग्रेस कमेटी तर्फे समर्थन देत काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी, काँग्रेस नेते सैय्यद अनवर व काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी बंद करीता निघालेल्या रेलीत सहभाग घेतला सदर रैलीची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यापासून होऊन संपूर्ण शहर फिरून परत याच ठिकाणी जाहीर निषेध सभा घेण्यात आली व त्यानंतर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक शाम सोनटक्के यांच्या मार्फत राष्ट्रपती व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले

याप्रसंगी काँग्रेस नेते अलीम शेख,रोशन दंतलवार,विशाल मादर,सुनील पाटील, अरविंद चहांदे, अंकुश सपाटे, तसेच

बौध्द सर्कल समितीचे अध्यक्ष भिमेंद्र कांबळे,बंडू रामटेके, सुजित सोनटक्के, नागेश पथाडे, अमित बोरकर( आप शहर अध्यक्ष )शरद पाईकराव( वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष )दिनेश घागरगुंडे,राजू पथाडे, आदिवासी संघटनेचे युवा अध्यक्ष दिपक पेंदोर, गणेश किन्नाके, मंदेशवर पेंदोर, लभीष आत्राम, गणेश किन्नाके, अंकुश उईके, विलास मेश्राम राकेश तिरणकर दुर्गा पाटील,सखू बाई ठमके, सौं. सुजाता सोनटक्के,पूनम कांबळे,उषा आगदारी (यंग चांदा ब्रिगेड )प्रीती तामगाडगे, सरोज पाझारे, अलका चुनारकर,उर्मिला आटे, योगिता मून, प्रियंका धुप्पे, पूजा पाटील व मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here