काँग्रेसच्या आंदोलनाला यश!

33
  1. काँग्रेसच्या आंदोलनाला यश!

अखेर घुग्घूस नप मुख्याधिकारी डॉ. जितेंद्र गादेवार यांची बदली?

घुग्घूस : चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या घुग्घूस शहराची लोकसंख्या ही जवळपास पन्नास हजारच्या जवळपास असून देखील शहरातील नगरपरिषदेत स्थायिक मुख्याधिकारी नियुक्त होत नव्हता नायब तहसीलदार डॉ. जितेंद्र गादेवार यांच्याकडे प्रभारी मुख्याधिकारी म्हणून पदभार सोपविण्यात आला होता.
ते आठवड्यात मंगळवार व शुक्रवारला नगरपरिषदेत येत असत मात्र त्यांच्या येण्याचा कुठलाच वेळ निर्धारित नसल्याने नागरिकांना प्रचंड त्रास भोगावा लागत असे स्थायिक मुख्याधिकारीच नसल्याने शहरातील रस्ते, नाली, पथदिवे, साफसफाई कुठल्याही प्रकारचे कामे होत नसल्याने नागरिकांच्या समस्या लक्षात घेत घुग्घूस शहर काँग्रेसच्या वतीने शहर अध्यक्ष राजुरेड्डी व कामगार नेते सैय्यद अनवर व पदाधिकाऱ्यांच्या वतीने स्थायी मुख्याधिकाऱ्यांच्या मागणीला घेऊन 08 ऑगस्ट रोजी आठवडी बाजार येथील स्व. प्रमोद महाजन मंचावर बारा ते चार असे एक दिवसीय धरणा आंदोलन घेण्यात आले.
शहरातील जनसामान्यांची समस्या प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यात आली
शेवटी काँग्रेसच्या आंदोलनाला यश प्राप्त झाले असून डॉ. जितेंद्र गादेवार यांची बदली झाली असून त्यांच्या ठिकाणी निलेश रंजनकर यांची स्थायी मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
निलेश रंजनकर यांच्या कार्यकाळात शहराचा सर्वांगीन विकास होईल असा आशावाद काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here