गाण्यावर (नृत्य )डांस केलं म्हणून निलंबित केलेल्या पोलिसांचे निलंबन रद्द करा : सैय्यद अनवर
चंद्रपूर : देश स्वातंत्र्यचा अमृत महोत्सव साजरा करीत असतांना नागपूर येथील तहसील पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पाटणकर, हेड कॉन्स्टेबल अब्दुल गणी, महिला पोलीस शिपाई भाग्यश्री गिरी, निर्मला गवळी यांच्यात ही स्वातंत्र्य दिनाचा आनंद व उत्साहात धुंद झाले खाकी वर्दीत असलेल्या या शिपायांचा सामान्य माणूस जागा झाला व त्यांनी खईके पान बनारस वाले या गाण्यावर वर्दीतच मनसोक्त डांस (नृत्य )केला यामुळे त्यांच्यावर वर्दीचा अनादर म्हणून पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी निलंबनाची कारवाई केली.
15 ऑगस्ट हा देशाचा सर्वात मोठा राष्ट्रीय उत्सव असून या दिवशी समस्त भारतीय बांधव आणि भगनीचा आनंद व उत्साह द्विगुणित असतो या दिवसाचा मान ठेवून सर्व निलंबित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निलंबन रद्द करून परत अशी चूक होणार नाही
अशी तंबी देऊन त्यांना परत सेवेत रुजू करून घ्यावी अशी मागणी पोलीस महासंचालक यांना काँग्रेस नेते सैय्यद अनवर यांनी केली आहे