महाराष्ट्रात महिलांचे व बालिकांचे संरक्षण न करणारे महाराष्ट्रातील युती सरकार बरखास्त करा
राज्यव्यापी आंदोलन अंतर्गत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे एसडिओ मार्फत राज्यपालांना निवेदन
______________________
वणी : महाराष्ट्रात वाढलेल्या महिलांवरील अत्याचाराचे विरोधात दिनांक २४ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी आंदोलन अंतर्गत वणी येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे वतीने उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपाल यांना निवेदन पक्षाचे सचिव ॲड. कॉ. कुमार मोहरमपुरी व ॲड. कॉ. दिलीप परचाके यांचे नेतृत्वात देण्यात आले.
महाराष्ट्रातील महिला आणि बालिकांवर होत असलेल्या वाढत्या अत्याचारांच्या विरोधात महाविकास आघाडीने शनिवार, दि. २४ ऑगस्ट रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली होती.
बदलापूर, पुणे, अकोला आदी ठिकाणी शाळांमधील लहानग्या विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचाराच्या मानवतेला काळिमा फासणाऱ्या घटना घडल्या आहेत. बदलापूर येथील घटना घडलेल्या शाळेचे संचालक रास्व संघ/भाजपचे असल्याने महायुतीच्या नेत्यांनी पोलिसांवर दबाव आणला. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास अक्षम्य टाळाटाळ केली. याविरुद्ध असंतोष व्यक्त करणाऱ्या जनतेवर अमानुष लाठीमार केला. बदलापूरचे माजी नगराध्यक्ष, एकनाथ शिंदे गटाचे वामन म्हात्रे यांनी एका महिला पत्रकाराशी बोलताना अतिशय अश्लाघ्य भाषा वापरली.
महायुतीने मुळातच गुन्हेगारीतून राज्याची सत्ता ताब्यात घेतली आहे. महाराष्ट्र ही सर्व प्रकारच्या गुन्ह्यांची राजधानी बनवत या महायुतीने आजवर सुसंस्कृत, महिला आणि सर्वसामान्यांचा आदर करणारे राज्य ही महाराष्ट्राची प्रतिमा मातीत घातली आहे.
बेटी बचाव, लाडकी बहीण या घोषणांमागील हे वास्तव आहे. राज्यातील महिलांना खरी गरज महायुती पोसत असलेल्या गुंडांपासून संरक्षणाची आहे.
यापूर्वी ठाणे जिल्ह्यातीलच कल्याण येथील गणेश घोळ मंदिरात सासरच्या छळाला कंटाळून थोडा मानसिक आधार घेण्यासाठी आलेल्या अंकिता म्हात्रेवर तीन पुजाऱ्यांनी बलात्कार करून तिचा खून केला होता. रायगडची यशश्री शिंदे, श्रद्धा भोईर……यादी न संपणारी आहे.
महायुती सरकारच्या महिला विरोधी कारभाराचा निषेध करून ही अनैतिक व अवैध महायुती सरकार बरखास्त करण्यात यावे यासाठी शनिवार २४ ऑगस्ट राज्यव्यापी आंदोलन अंतर्गत वणी येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे वतीने उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत महामहीम राज्यपाल यांना निवेदन देताना ऍड. कॉ. कुमार मोहरमपुरी, ऍड. कॉ. दिलीप परचाके, कॉ. कवडू चांदेकर, कॉ. शंकर गाऊत्रे, कॉ. नंदू बोबडे, कॉ. अशोक गेडाम, कॉ. विलास कुमरे, कॉ. सुभाष नांदेकर, कॉ. सुनील गेडाम, कॉ. हरीश वासेकर, कॉ. गजानन ताकसांडे, कॉ. अमोल चटप, कॉ. हुसेन आत्राम, कॉ. नेताजी गेडाम, कॉ. अर्जुन शेडमाके आदी. प्रामुख्याने उपस्थित होते.