विजयक्रांती जि.ई.पि.एल.पाॅवर स्थायी कामगार संघटना तर्फे उसगांव गुप्ता एनर्जी प्रा,लि,कंपनीवर धरना आंदोलन
घुग्घुस:
गुप्ता एनर्जी प्रा. लि. च्या 103 प्रकल्पग्रस्त शेतकरी कामगारांना, हस्तांतरित कंपनी विदर्भ मिनरल्स अँड एनर्जी प्रा. लि. नि कामावर रुजू करून यावे, अन्यथा प्रकल्पग्रस्त कामगारा द्वारे काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला गेला होता
दिनांक 04/08/2023 च्या सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रपुर ह्यांच्या कार्यालयात झालेली बैठक
उपरोक्त संदर्भाकीत विषयाद्वारे आपणास कळविण्यात आले होते की, 2008 ते 2009 या कालावधीत गुप्ता एनर्जी पॉवर लिमिटेड या कंपनी तर्फे मौजा उसेगाव, शेनगाव, वठा, पांढरकवठा, घुग्घूस क्षेत्रातील शेतजमिनी संपादित करण्यात आल्या तसेच कंपनीसाठी शेतजमिनी संपादित करत असतांना संबंधित शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला आणि त्या जमिनीवर आश्रित शेतक-यांच्या परिवरातील एका सदस्याला कंपनीत स्थायी नौकरी असा करार करून सदर करारपत्राद्वारे त्या शेतकरी कामगारांना नौकरी साठी 2012 – 2013 मध्ये रुजू करण्यात आले होते. सदर कंपनी एक ते दीड वर्ष व्यवस्थित चालवून काहीं कारणास्तव त्या कंपनी कडून उत्पादन बंद करण्यात आले होते. तसेच त्यानंतर संबंधित कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा कामगारांना विश्वासात न येता कंपनीने सरळ उत्पादन बंद करून टाकले. आपल्या शेतजमीनिवर आश्रित शेतकरी कामगारांना स्थायी नौकरीचे आमिष दाखवून त्यांच्या जमिनी बाजारभावापेक्षा कमी किमतीत संपादित केल्या. नंतर काही वर्षातच कंपनीने स्वताला दिवाळखोर घोषित करत, सदर कंपनीचा दावा NCIT कोर्टा रागक्ष प्रस्तुत केला गेला. आणि आज लिक्विडेटर मार्फत कामगारांना त्यांनी दिलेल्या सेवेचा मोबदला म्हणून काही तुटपुंजी स्वकम देवून कामगारांना त्यांच्या रोजगारापसून कायमचं डावलण्याचा प्रयत्न केल्या जात आहे. कंपनी बंद झाल्यामुळे, त्या जमिनीवर आश्रित शेतकऱ्यांच्या जमिनीही गेल्या आणि त्या शेतीसंबंधित कामगारांचा रोजगारही गेला, यामुळे संबंधित कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न उपस्थित झाला, तसेच या बेरोजगारिचा प्रश्न मिटविण्यासाठी कामगारानी मा. जिल्हाधिकारी साहेबांच्या कार्यालयसमोर वर्ष 2017 मध्ये आंदोलन सुद्धा केले आहे. त्या आंदोलना दरम्यान तत्कालीन जिल्हाधिकारी साहेबांच्या अध्यक्षतेखाली, कामगारा सोबत बैठकि अंतर्गत आश्वासन देण्यात आले की, कंपनी जेव्हा केंव्हा चालू होईल तेव्हा, जुन्या कार्यरत कामगारांना प्राधान्य देण्यात येईल. आणि कंपनी बंद झाल्यापासून तर आजपर्यंत हा कामगार नौकरीच्या आशेवर कंपनी पूर्ववत चालू होण्याची वाट पाहत आहे.
सद्यपरिस्थितीत गुप्ता एनर्जी प्रा. लि. या कंपनीचे NCLT कोर्टानुसार परिवलनावे सर्व हस्तांतरित अधिकार विदर्भ मिनरल्स अँड एनर्जी प्रायवेट लि. या कंपनीकडे आले आहेत. सदर कंपनीकडून स्थानिक कामगारांना किंवा प्रकल्पग्रस्त शेतक-यांना डावलून स्वतः ची जबाबदारी झटकण्याचे प्रयत्न केल्या जात आहे. परप्रांतीय कामगारा द्वारे कंपनी पूर्ववत चालू करण्याहेतू मेंटेनन्स चे काम पूर्णत्वास आणले असून कंपनी ट्रायल बेस वर पूर्वस्त चालू होण्याच्या मार्गावर आहे.
सदर कंपनिकडे तसेच संबंधित प्रशासनाकडे रोजगारासाठी आस लावून बसलेल्या कामगारातर्फे वारंवार निवेदन देवून कामावर रुजू करून घेण्यास विनंती करण्यात आली आहे, तरीपण मुजोर कंपनी कडून किंवा प्रशासनाकडून शेतकरी कामगारांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. या कंपनीकडून शेतकऱ्यांचे आणि कामगारांचे रोजगार हिरविण्यात आले आहे. कदाचित या बेरोजगारीमुळे व आर्थिक, मानसिक, सामाजिक शोषनामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्तेसह, आम्हा कामगारांच्या सुद्धा आत्महत्या व्हायला वेळ लागणार नाही.
तरी संबंधित प्रशासनाला नम्र विनंती की, सदर कंपनीवर कठोर कारवाही करून NCLT च्या बाबतीत योग्य ती चौकशी करण्यात यावी व त्यांच्या रेजूलेशन अंतर्गत गुप्ता एनर्जी पॉवर लि. मध्ये कार्यरत कामगारांना, NCLT हस्तांतरित कंपनी, विदर्भ मिनरल्स अँड एनर्जी प्रा. लि. मध्ये स्थायी स्वरुपात रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा. आम्हा प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि कामगारांचा संवेदनशील प्रश्नाला वाच्या फोडून न्याय देण्याविषयी प्रशासनाला कंपनीला सदर पत्र प्राप्ती करण्यात आली असून, दि. 25/08/2024 पर्यंत सबंधित प्रशासन तथा कंपनी व्यवस्थापनाने कामगारांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न सोडवावे, अन्यथा आम्हा प्रकल्पग्रस्त शेतकरी तथा कामभारातर्फे संबंधित कंपनीच्या गेटसमोर दि. 26/08/2024 पासून काम बंद आंदोलन करण्यात येईल. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर, त्याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासन तसेच कंपनी व्यवस्थापनेची राहील.
कंपनीच्या माहितीस व उचित कारवाहीसाठी सादर.
कार्याध्यक्ष: प्रविण मारोतराव लांडगे
महासचिव :महेंद्र मारोती वडस्कर यानी पञाद्वारे दिली गेली होती,
प्रतिलीपी :
४. जिल्हाधिकारी, साहेब, चंद्रपुर
2. मा. अप्पर कामगार आयुक्त साहेब, नागपूर
3. विदर्भ मिनरल्स अँड एनर्जी प्रा. लि.
गुप्ता एनर्जी पॉवर प्रा. लि उसेगाव जि. चंद्रपूर
4. मा. पोलिस अधीक्षक साहेब, चंद्रपुर
5. ठाणेदार साहेब, पोलिस स्टेशन, घुग्घूस याना देण्यात आले