शहरात डेंग्यूचा वाढता धोखा लक्षात घेता कीटकनाशक फवारणी करा
शहर काँग्रेसची नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदनातून मागणी
डेंग्यूमुळे 25 वर्षीय तरुणीचा मृत्यू
घुग्घूस : शहरातील साई बाबा नगर वॉर्ड क्रं 06 येथील 25 वर्षीय फॅशन डिजायनर तरुणी तन्वी कुम्मरवार हिचा डेंगू मलेरिया झाल्यानंतर केवळ 48 तासात नागपूर येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घुग्घूस शहरात सध्या सर्वत्र घाणीचा साम्राज्य पसरले असून डास / मच्छर यांची प्रचंड संख्या वाढली असून शहरात मलेरिया व डेंगू मलेरियाची साथ पसरली आहे
शहरातील दवाखाने हे आजारी नागरिकांनी तुडुंब भरले आहेत. डेंग्यूमुळे परत कुणाची मृत्यू होऊ नये अन्य नागरिकांचे जीव जाऊ नये म्हणून तातळीने संपूर्ण शहरात फॉगीग मशीन द्वारे जंतनाशक औषधीचे फवारणी करावी या मागणी साठी काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नप मुख्याधिकारी निलेश रांजनकर यांची भेट घेऊन समस्या सोडविण्यासाठी विनंती केली असता त्यांनी तातळीने संपूर्ण शहरात जंतूनाशकाची फवारणी करण्याचे आश्वासन दिले व परत कुणाचे जीव जाऊ नये यासाठी शर्थीचे प्रयत्न करू अशी ग्वाही दिली
याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर, जिल्हा महासचिव अजय उपाध्ये, सोशल मीडिया अध्यक्ष रोशन दंतलवार, मोसीम शेख, विशाल मादर, नुरूल सिद्दीकी,एन. एस. यु. आय अध्यक्ष आकाश चिलका, बालकिशन कुळसंगे, सुनील पाटील,अनुग्रह मायकल,कुमार रुद्रारप,अंकुश सपाटे, भीमराव कांबळे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते