शिवसेना घुग्घूस
लैंगिक अत्याचार करणारे आरोपीना कठोर शिक्षा देण्यात यावे!
युवासेना उपजिल्हाप्रमुख : हेमराज भाऊ बावणे यांची निवेदनाद्वारे मागणी !
————————————————————————-—
घुग्घुस: दिनांक २६/०८/२०२४ आपल्या देशामध्ये व राज्यामध्ये लैंगिक अत्याचारांच्या घटनेमध्ये वाढ होत आहे . तसेच दुर्गापूर येथील एका अल्पवयीन मुलीवर पानठेला चालकाने लैंगिक अत्याचार केला .*
*त्या अल्पवयीन मुलीने खऱ्याचे उधारीचे पैसे नाही दिल्याने पानठेला चालकाने लैंगिक अत्याचार केला तसेच नागभिड येथे एका मनोरुग्ण महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली व तसेच ब्रह्मपुरी येथे सतत दोन वर्षापासून एक पि.टि शिक्षकाने दहावी च्या शिक्षण घेणाऱ्या नाबालिक विद्यार्थिनीवर सतत अत्याचार करत होता.*
*व अशा अनेक अत्याचार आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये व देशांमध्ये घडत आहे*
*अशा अत्याचार करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावे याकरिता शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप भाऊ गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात युवासेना उपजिल्हाप्रमुख हेमराज भाऊ बावणे यांच्याद्वारे पोलीस स्टेशन घुग्घूस येथिल पी.आय पुल्लारवार साहेब यांना निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली की अशा अत्याचार करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावे.
निवेदन देता वेळेस- युवा सेना उपजिल्हाप्रमुख हेमराज बावणे , शिवसेना शहरप्रमुख बंटी घोरपडे, युवा सेना शहरप्रमुख चेतन बोबडे, शिवसेना नेते बालू चिकनकर , वेदप्रकाश जी महेता, शिवसेना उपशहर प्रमुख अनुप कोंगरे, निखिल मोहितकर, व अनेक शिवसैनिक युवासेनी उपस्थित होते*