भाजपातर्फे नप घुग्घुसचे नवनियुक्त मुख्याधिकारी यांचे स्वागत
********************************************
हनिफ शेख
घुग्घुस : येथील भाजपातर्फे नगर परिषद घुग्घुसचे नवनियुक्त मुख्याधिकारी निलेश रांजनकर यांचे स्वागत करण्यात आले.
मुख्याधिकारी निलेश रांजनकर हे नगर परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून नुकतेच रुजू झाले आहे.
त्या अनुषंगाने भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी शिष्टमंडळासह नगर परिषदेचे मुख्याधिकारी निलेश रांजनकर यांची भेट घेतली व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, माजी सरपंच संतोष नुने, संजय तिवारी, साजन गोहणे, चिन्नाजी नलभोगा, अमोल थेरे, शिवसेना शहरप्रमुख महेश डोंगे, हसन शेख, बबलू सातपुते, इर्शाद कुरेशी, प्रवीण सोदारी, शाम आगदारी,सुशील डांगे,अमोल नागपुरे, दिपक कामतवार व कार्यकर्ते उपस्थित होते.