-
सत्तेच्या दुरुपयोगातून शासकीय जागा हडपण्याचा काँग्रेस तर्फे भांडाफोड!
आक्षेप घेण्याच्या मुदती नंतर प्रसिद्ध केले पत्रक
-
घुग्घूस : शहरातील पोलीस इमारती साठी राखीव असलेल्या शासकीय जागेवर भारतीय जनता पक्षाने अतिक्रमण करून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार सेवा केंद्र उभारले आहे. सर्व्ह क्रं 17 मधील सर्वच 0.43 जागा आपल्या ताब्यात घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाने शहर अध्यक्ष विवेक बोढे यांच्या धर्मपत्नी किरण विवेक बोढे यांना पुढे करीत वाचनालयाच्या नावावर समृद्धी लोक कल्याणकारी संस्थेच्या नावावर सदर जागा भाड्याने देण्यात यावी अश्या स्वरूपाची मागणी तहसीलदार यांना अर्जातुन केली.
-
या संदर्भात तहसीलदार चंद्रपूर यांनी 08/08/2024 नगरपरिषदला जाहीरनामा प्रसिद्धी करीता देण्यासाठी पत्र काढले व नागरिकांचे आक्षेप नोंदविण्याची शेवटची 30/08/2024 रोजी ठेवण्यात आली.
-
मात्र सदर पत्र घुग्घूस नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना आक्षेप घेण्याच्या अंतिम तारीख म्हणजेच 30/08/2024 नंतर मिळाले सदर जमीन गुपचूप रित्या भाजपच्या घश्यात घालण्याचा हा षडयंत्र शासकीय स्तरावर सत्तेच्या बळावर रचण्यात आले.
-
सदर प्रकरणाची माहिती काँग्रेस नेत्यांना लागताच काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार नेते सैय्यद अनवर व काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी निलेश रांजनकर यांना जाब विचारला असता त्यांनी स्पष्टपणे कबूल केले की या प्रकरणातील जाहीर नामा मला 02 सप्टेंबर रोजी मिळाला मी तसेच सूचना फ्लकावर लावला असून यात माझा काही दोष नसल्याचा स्पष्ट केल्याने
काँग्रेस नेते वरिष्ठ स्तरावर कारवाई करण्या संदर्भात हालचाली करीत आहे
-
सदर शिष्टमंडळात काँग्रेस ज्येष्ठ नेते शाम राव बोबडे,माजी उप – सरपंच सुधाकर बांदूरकर,अलीम शेख, सोशल मीडिया अध्यक्ष रोशन दंतलवार, एन. एस. यु. आय अध्यक्ष आकाश चिलका,जिल्हा सचिव अजय उपाध्ये,इंटक उपाध्यक्ष शहजाद शेख, शेख शमिउद्दीन,सुनील पाटील,कुमार रुद्रारप,संदीप कांबळे, शंहशाह शेख, अंकुश सपाटे, सूरज ठावरी, सन्नी कुम्मरवार, भीमराव कांबळे, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.