घुग्गुस येथे नंदी बैल सजावट स्पर्धा थाटात संपन्न

29

घुग्गुस येथे नंदी बैल सजावट स्पर्धा थाटात संपन्न


घुग्घुस : तान्हा पोळा, गणपती, दुर्गाउत्सव आयोजन समिती व भाजपातर्फे मंगळवारला गांधी चौकात नंदी बैल सजावट स्पर्धा पार पडली.
प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा महामंत्री भाजपा जिल्हा चंद्रपूर विवेक बोढे, मुख्याधिकारी निलेश रांजनकर, ठाणेदार शाम सोनटक्के, सहायक पोलिस निरीक्षक सचिन तायवाडे, लॉयड्स मेटल्सचे तरुण केशवाणी, माजी सभापती जि.प.चंद्रपूर नितु चौधरी, माजी जि.प.सदस्य चिन्नाजी नलभोगा, माजी जिल्हा सचिव विनोद चौधरी, माजी सदस्य साजन गोहने, भाजपाचे अमोल थेरे, शिवसेना शहराध्यक्ष महेश डोंगे, वैशाली ढवस, सुचिता लुटे, पत्रकार शब्बीर सिद्दीकी, हेमराज बोंबले, तुलसीदास ढवस, सतीश बोन्डे, रवी चुने, धनराज पारखी, सुरेंद्र भोंगळे, सुरेंद्र जोगी, जेष्ठ समाजसेवक प्रेमलाल पारधी, दीपक कुटेमाटे, परीक्षक संजय उपाध्ये, प्रशिक्षक विनय बोढे उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते प्रथम पारितोषिक २,००१ रुपये अंश कोयाडवार, द्वितीय पारितोषिक १,५०१ रुपये, जानवी सावे, तृतीय पारितोषिक १,००१ रुपये, रियांश खांडेकर यांना देण्यात आले. प्रोत्साहन पर पारितोषिक २०० रुपये देण्यात आले. जवळपास १५० स्पर्धकांनी भाग घेतला होता.
यशस्वीतेसाठी गणेश कुटेमाटे, पियुष भोंगळे, गौरव ठाकरे, गजानन जोगी, शुभम जेऊरकर, राहुल ठाकरे, परिमल नांदे, मंगेश राजूरकर, उमेश दडमल, प्रणय बोकडे, गणेश दडमल, प्रणय मुक्के, गणेश राजूरकर यांनी परिश्रम घेतले. यावेळी मोठया संख्येत नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here