जनता विद्यालय साखरवाही येथे ‘शिक्षक दिन’ साजरा

16

जनता विद्यालय साखरवाही येथे ‘शिक्षक दिन’ साजरा


घुग्घुस : येथून जवळच असलेल्या साखरवाही येथील जनता विद्यालयात गुरुवार, ५ सप्टेंबर रोजी सकाळी ‘शिक्षक दिन’ साजरा करण्यात आला.

याप्रसंगी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले.

शिक्षक असलेले भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती हा दिवस देशभर ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो.

जनता विद्यालयाचे शिक्षक विवेक बोढे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जनता विद्यालयाच्या मुख्याध्यापीका पेटकर मॅडम यांनी भुषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून येडे सर, पिपरे सर, कांबळे सर, आगलावे सर उपस्थित होते.

संचालन १० व्या वर्गाची विद्यार्थिनी प्रतीक्षा खारकर यांनी तर आभार कांबळे सरांनी मानले.

यशस्वीतेसाठी शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी यांनी प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here