नगरपरिषद घुगुस मार्फत पर्यावरण पूरक शाडूमातीची गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळेचे आयोजन

48

नगरपरिषद घुगुस मार्फत पर्यावरण पूरक शाडूमातीची गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळेचे आयोजन


घुग्घुस: .माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ महाराष्ट्र सर्वेक्षण अभियानांतर्गत प्रदूषणाला आढा घालण्याच्या हेतूने तसेच गणेश उत्सवाच्या निमित्त नगरपरिषद घुगुस मार्फत माननीय मुख्यधिकारी यांचे मार्गदर्शना खाली जिल्हा परिषद कन्या शाळा येथील पटांगणात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.या कार्यशाळेत शहरातील अनेक शाळांनी सहभाग नोंदविला यात ग्रेस इनअमोल स्कूल घुगुस, जनता विद्यालय घुगुस, जि.प.मुलांची शाळा, जि.प.कन्या शाळा, जि.प.उच्च प्रा.शा. उर्दू आणि हिंदी शाळांना आपला सहभाग नोंदवला या कार्यशाळेत प्रत्येक शाळेचे पाच पाच मुला मुलींचा गट बनवून यांना पर्यावरण पूरक शाडूमातीची मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण देऊन गणेश मूर्ती बनवण्याची स्पर्धेचेआयोजन करण्यात आले. या स्पर्धेत एकूण 26 मुला मुलींचे गटांनी आपला सहभाग नोंदविला. या स्पर्धेत जि.प. मुलांची शाळा वर्ग चौथा समर्थ ग्रुप यांनी प्रथम क्रमांक पटकावला, जि.प. कन्या शाळा वर्ग चौथा चैताली ग्रुप यांनी दुसरा क्रमांक पटकावला, तिसरा क्रमांक दोन ग्रुप मध्ये देण्यात आला. यात जनता विद्यालय वर्ग आठवा अमन ग्रुप व जि.प.हिंदी शाळा वर्ग सातवा दीपक ग्रुप यांची निवड करण्यात आली. कार्यशाळेचे उद्घाटन मा.श्री निलेश रांजणकर मुख्याधिकारी नगरपरिषद घुगुस यांच्या हस्ते पार पाडण्यात आले तसेच सदर कार्यक्रमादरम्यान माननीय मुख्याधिकारी यांनी संबोधनात शालेय विद्यार्थी यांना शुद्ध जल स्वस्थ जिवन बाबत माहिती दिली, तसेच आपण जे सण इतक्या उत्साहाने साजरा करतो त्याचे दुष्परिणाम निसर्गावर व पर्यावरणावर कसे होतात याबाबत शाडूमातीची मूर्ती व प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती मधील फरक विद्यार्थ्यांना समजून दिले. या स्पर्धेचे निरीक्षक श्री मनीष जुनघरे कनिष्ठ अभियंता न.प. घुगुस व श्री अनिल डांगोरे स्वच्छता निरीक्षक न.प.घुगुस यांनी केले. या कार्यशाळाचे उद्घाटनाचा वेळी विशेषतः श्री किशोर अल्याडवार उच्च श्रेणी मुख्याध्यापक, जि.प.उच्च प्रा.शा.घुग्घुस कन्या, सौ.ममता वासाडे, मुख्याध्यापिका, जि प केंद्रीय प्रा. शा. घुग्घुस मुले उपस्थित होते तसेच शाळेचे शिक्षक व शिक्षिका यांचा सक्रिय योगदान होता. कार्यशाळा यशस्वी करण्याकरिता लूमीता नागपुरे शहर समन्वयक,श्री सुरज जंगम, श्री जगदीश धोपटे, श्री तुषार पाडेवार न.प.घुगुस, यांनी प्रयत्न केले. मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण देणारे मूर्तिकार श्री प्रकाश सबलवार यांचे प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here