– मौजा वांजरी ता. वणी येथील स्थित डोलामाईट खदान जिवालाधोका असल्याने त्याचे उच्चस्तरीय चौकशी व पाहणी करुन त्वरित बंद करण्याबाबत निवेदन.

15

मौजा वांजरी ता. वणी येथील स्थित डोलामाईट खदान जिवालाधोका असल्याने त्याचे उच्चस्तरीय चौकशी व पाहणी करुन त्वरित बंद करण्याबाबत निवेदन.

राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गट


उपविभागीय अधिकारी वणी याना निवेदन देकर मांगणी


वणी : मौजा वणी येथून 5 किमी अंतरावर मौजा वांजरी येथे असलेली दोन डोलामाईट खदान आहे. वरिल खदानीत दिनांक 02/09/2023 रोजी 1. असीम अब्दुल सतार, 2. नोमान शेख साबीर शेख आणि 3. प्रतीक संजय मडावी हे तीन बालके दुर्दैवी बुडून मृत्यू पावले. वरिल तिन्ही बालके हे वरिल डोलामाईट खदानीत पोहण्याकरिता उतरले परंतू पाण्याचा अंदाज न आल्यामूळे बुडून मृत्यू पावले. वरिल तिघांचाही मृत्यू वरिल अवैध डोलामाईट खदानीमुळे झाला असून सदर खदानीकरिता कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था किंवा रक्षक त्या ठिकाणी हजर नव्हते त्यामूळे त्यांचा नाहक जीव जाउन त्यांचे पालक है निराधार झाले आहे. वरिल तिन्ही बालकांच्या अकाली मृत्यूमुळे त्यांचे कुटूंब हे निराधार आणि असहाय्य झाले असून त्यांना नुकसान भरपाई मिळणे कमप्राप्त असताना त्याना अजूनपावेतो प्राप्त झाली नाही किंवा त्याबाबत कोणत्याही संबंधीतांनी त्यांच्या कुटूंबाशी कोणताही संपर्क साधून दिलगिरी व्यक्त केली नाही हे त्यांचे दुर्दैव आहे.

2. याबाबत आम्ही असेही कळवितो की वरिल डोलामाईट खदानीकरिता शासकीय परवानगीचे उल्लंघन करण्यात येउन नियमबाह्य खोल खोदकाम करण्यात आले. तसेच परवानगीचे शर्ती व अटींचे उल्लंघन करून वरिल खदान ही अत्यंत खोल खोदली असून त्याच्या खोलीचा अंदाज येत नाही. तसेच वरिल खदानीची खोली ही खनिकर्म शाखा व्यवसाय आणि खदान खाते मंत्रालय, मंबई-32 यांचेकडून पारित केलेल्या शर्ती आणि अर्टीचे उल्लंघन करुन खोदण्यात आली असून त्यांत पावसाचे पाणी साचलेले असते. वरिल खदानीत कोणत्याही प्रकारची तटरक्षक भिंत वा कोणतेही सुचना फलक लावलेले नाही त्यामूळे तेथे यापूर्वी सुध्दा जीवहानी झाली आहे.

3. वरिल खदानीकरिता लागणारी शासकीय परवानगी ही शासनाच्या शर्ती, अटी व नियमानुसार नुतनीकरण झाले किंवा नाही याची सुध्दा चौकशी होणे गरजेचे आहे. तसेच वेळोवेळी शासनाने लादलेल्या शर्ती आणि अटींचे पालन संबंधीत परवानाधारक यांनो केले वा नाही तसेच त्यात खोदकाम ही ठरलेल्या खोलीनुसार करण्यात आली नसून ती अत्यंत खोल असून त्यांत अनेक वेळा
 जीवहानी झाली आहे. तसेच त्यांत जनावरे सुध्दा बुडून मृत पावलेली आहे. वरिल खदानीत उत्खणन करण्यात आलेला माल हा त्याच जागेवर पडून असून शासकीय नियमबाह्य खोदकाम करण्यात आले आहे. त्यामूळे भविष्यात पून्हा मोठ्या प्रमाणात जिवहानी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. वरिल खदानीत होत असलेले अवैध खोदकाम आणि त्यापासून झालेली जिवहानी याबाबतची सखोल चौकशी होउन मृतकांच्या पालकांना उचित ती भरपाई मिळणे गरजेचे आहे. तसेच परवानाधारकांनी शासनाच्या शर्ती आणि अटींचे केलेल्या उल्लंघनाबाबत त्यांचेविरुध्द कठोर कारवाई करुन सदर उत्खनन करण्यांत याव्यात ही विनंती. तातडीने बंद करण्यात यावे हि विनंती. करिता निवेदन सादर केले आहे.

सदर राष्ट्रावादी पार्टी अजित पवार गट पक्षा तर्फे या निवेदनाची दखल घ्यावी अन्यथा आम्हाला आमच्या पक्षाच्या वतीने तिव्र आंदोलन करावा लागेल. हि सविनय पुर्वक विनंती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here