लॉयड्स मेटल्स कंपनीत महिलांना रोजगार द्या :यास्मिन सैय्यद

15

लॉयड्स मेटल्स कंपनीत महिलांना रोजगार द्या :यास्मिन सैय्यद


घुग्घूस : शहरात महिलांची संख्या ही पुरुषांच्या बरोबरीची असून आज महिल्या सुशिक्षित असून तांत्रिक कार्यात ही तरबेज आहेत.
उद्योगा कडून पसरविण्यात येणाऱ्या प्रदूषणाने महिलांना अनेक गंभीर आजाराने जडले आहेत
मात्र मोजक्याच महिलांना या उद्योगात रोजगार उपलब्ध करून दिला आहेत
लोकसंख्येच्या अनुपाता नुसार तीस टक्के महिलांना लॉयड्स कंपनीत रोजगार उपलब्ध करून द्या अशी मागणी महिला क्रांती ग्रुपच्या वतीने यास्मिन सैय्यद व सुजाता सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली लॉयड्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आलेली आहेत.
यासोबतच लॉयड्स कंपनीच्या मुख्य प्रवेश द्वारावर गेल्या अनेक वर्षांपासून आपली भाजीपाल्याची दुकान चालविणाऱ्या लता नागेश नलभोगा या विधवा महिलांचे दुकान अतिक्रमणाच्या नावाखाली उठविण्यात आला सदर महिलेला दहा लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावे, शहरातील गरीब, विधवा, परित्यकता निराधार महिलांना शिवण क्लासेस, कॉम्पुटर कोर्स सह अन्य स्वयंरोजगाराचे मोफत निशुल्क प्रशिक्षण केंद्र उपलब्ध करून देण्यात यावे.
शहरातील गरीब गरजवंत मुली मुलांना शालेय साहित्य, मुलींना शाळेत जाण्यासाठी सायकल, व मोफत कॉम्पुटर ( टॅबलेट ) वितरण करण्यात यावे व शहरात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करावे अशी मागणी करण्यात आली महिलांच्या विषयावर गांभीर्य पूर्वक विचार करून समस्या न सोडविल्यास 30 सप्टेंबर रोजी होणाऱ्या जनसुनावणीत शहरातील शेकडो महिलांना घेऊन कंपनी विरोधात आंदोलन करण्याचा इशारा महिलांनी दिला आहेत

घूघूस हा औद्योगिक शहर असून शहरातील लॉयड्स मेटल्स कंपनीच्या वतीने नवीन विस्तारित प्रकल्प निर्माण करण्यात येत असून यामध्ये अनेक रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याने यात महिलांना ही सहभागी करावे त्यांना रोजगार द्यावा अशी प्रमुख मागणी महिला क्रांती संघटने द्वारा केली आहेत.

याप्रसंगी शिष्टमंडळात सरस्वती पाटील, शिल्पा गोहील,मंगला बुरांडे,नीलिमा वाघमारे, चंदा ताई दुर्गे,अनुसया नन्नावरे, अर्चना पचारे, मिना कार्लेकर,वर्षा पाटील, अश्विनी दुर्वे, वर्षा गावंडे,सुनीता आत्राम,रंजना आत्राम,सुनीता चिवाने, सुनीता आत्राम,मिरा ताई, नंदा ताई व मोठया संख्येने महिला उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here