घुग्घुसमधील लॉयड्स मेटलचा प्रस्तावित विस्तार रद्द करा

77

घुग्घुसमधील लॉयड्स मेटलचा प्रस्तावित विस्तार रद्द करा


चंद्रपूर शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख संदीप भाऊ गिऱ्हे यांची मागणी


शिवसेनेचा विस्तारिकरणास विरोध
घुग्घुसमधील लॉयड्स मेटलचा प्रस्तावित विस्तार रद्द करा अशी मागणी चंद्रपूर शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख संदीप भाऊ गिऱ्हे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
घुग्घुसमधील नागरिकांसाठी एक भयंकर संकट उभे राहण्याच्या तयारीत आहे. लॉयड्स मेटल कंपनीचा प्रस्तावित विस्तार मंजूर होता कामा नये. अन्यथा नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल. कंपनीच्या प्रदूषणामुळे येणारी पिढी निरोगी जगणार नाही. संबंधित विस्ताराच्या रूपात नागरिकांच्या आरोग्य व पर्यावरणावर खुप मोठे संकट येऊ घातले आहे.
सध्या चालू असलेल्या प्रकल्पामुळे हवेत पिएम २. ५ आणि पिएम १० धूळ कनांचे प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहचले आहे. प्रस्तावित विस्तारामुळे हे धूळ कण अधिक प्रमाणात हवेत मिसळतील परिणामी शुद्ध हवा श्वास घेण्यासाठी मिळणे कठीण होईल.
त्यामुळे लॉयड्स मेटलचा प्रस्तावित विस्तार रद्द करा अशी मागणी करण्यात आली आहे.
शिवसेनेचा विस्तारिकरणास विरोध असून विस्तारिकरण केल्यास लॉयड्स मेटल कंपनी विरुद्ध शिवसेना आंदोलन करणार आहे.
निवेदन देता वेळेस -युवा सेना उपजिल्हाप्रमुख हेमराज बावणे, सिक्की भैय्या, घुग्घूस शिवसेना शहरप्रमुख बंटी घोरपडे, शिवसेना उपशहर प्रमुख अनुप कोंगरे, शिवसेना उपतालुकाप्रमुख योगेश भांदक्कर, शिवसेना नेते बाळू चिकनकर, वेद प्रकाश मेहता, रघुनाथ धोंगडे, अमित पिंपळकर, निखिल मोहितकर व शिवसैनिक युवा सैनिक उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here