आर्थिक उन्नती आणि नवीन रोजगार निर्मिती करून लॉयड्स मेटल्सने केला घुग्गुसचा काया पालट
घुग्घुस : लॉयड्स मेटल्स आता त्यांच्या नवीन विस्तार योजनांमध्ये लक्षणीय प्रगती करत आहे. या प्रगती मुळे केवळ त्यांची आर्थिक उन्नती होते असे नाही, तर स्थानिक लोकांसाठी रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण होत असता. या प्रदेशातील सर्वात मोठ्या औदयोगिक संस्थांपैकी एक असल्याने लॉयड्स मेटल्स त्यांच्या घुगुस येथील प्लांटमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे 1000 हून अधिक लोकांना रोजगार देत आहे.
स्थानिक अर्थव्यवस्थेत ही रोजगार निर्मिती महत्त्वाचे योगदान देत आहे. आता तर कंपनी विस्तारासाठी सुद्धा सज्ज झालेली आहे. या मुळे स्थानिकांसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या आणखी अनेक संधी निर्माण होणार आहेत.
लॉयड्स मेटल्ससोबत काम करण्याचा अनुभव सांगताना, श्री राजेश पटेल म्हणतात, “मी ३० वर्षांपासून लॉयड्ससोबत काम करत आहे आणि मी स्वतःच्या आणि स्थानिक क्षेत्राच्या विकासाचा प्रवास पाहिला आहे. कंपनीने पायाभूत सुविधां मध्ये सुधारणा करून आणि कर्मचाऱ्यांना तसेच स्थानिक नागरिकांना चांगल्या सुविधा पुरवून या प्रदेशाचे रूप पूर्णपणे बदलून टाकले आहे. “
सध्याची लॉयड्स मेटल्स ची DRI म्हणजेच स्पंज आयरन उत्पादन क्षमता 270,000 mtpa इतकी असून त्यासा ठी 30 MW (मेगा वॅट) क्षमतेचा कॅप्टिव्ह पॉवर प्लांट सुद्धा आहे. याच्या माध्यमातून कंपनीने या प्रदेशात शाश्वत विकासाचे उदाहरणच प्रस्तुत केलेले आहे.
नजीकच्या भविष्यात, लॉयड्सची DRI उत्पा दन क्षमता अतिरिक्त 324,000 mtpa ने वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. शिवाय 1.2 MTPA च्या उत्पादन क्षमतेसह एकात्मिक स्टील प्लांटची स्थापना करण्याची सुद्धा तयारी आहे. एवढेच नव्हे, व्हे तर त्याच्या विस्तार धोरणाचा एक भाग म्हणून लॉयड्स मेटल 4 MTPA क्षमतेचा पॅलेट प्लांट स्थापन करण्यासा ठी आणि त्याच्या कॅप्टिव्ह पॉवर प्लांटची क्षमता 90 MW ने वा ढविण्याच्या तयारीत आहोत.
लॉयड्स मेटल्स आपल्या महत्त्वाकांक्षी विस्तार योजनांसह पुढे जात आहे. मात्र विकासाच्या या यात्रेत कंपनी केवळ उद्योगात स्वतःचे स्थान मजबूत करण्यासाठीच नव्हे तर या क्षेत्राच्या आर्थिक आणि सामाजिक बांधणीसाठी देखील तितक्याच क्षमतेने कार्य करत आहे.
रोजगाराच्या नवीन संधींची निर्मिती करणे आणि उत्पादन क्षमता वाढवणे हे कंपनीच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीकोणाचे प्रतिक आहे. आपण कार्यरत असलेल्या क्षेत्रातील स्थानिक जनतेची प्रगती झाली पाहिजे, हीच लॉयड्सची भूमिका आहे.