ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन
घुग्घुस : येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात बुधवार, २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि ‘जय जवान जय किसान’ नारा देऊन देशवासीयांत चैतन्य फुंकणारे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले.
यावेळी माजी सरपंच संतोष नुने, जिल्हा सचिव विनोद चौधरी, अमोल थेरे, इर्शाद कुरेशी, पियुष भोंगळे, संदीप तेलंग, सुनंदा लिहीतकर, शीतल कामतवार, भारती परते, स्वाती गंगाधरे, नेहा कुम्मरवार, पायल वाडगुरे आदींची उपस्थिती होती.