वणी शहराती पार्किंगची व्यवस्था नसलेल्या बँक व पतसंस्था शहरात चालविण्यास परवानगी न देण्याबाबत नगर परिषदेला निवेदन

29

 

वणी शहराती पार्किंगची व्यवस्था नसलेल्या बँक व पतसंस्था शहरात चालविण्यास परवानगी न देण्याबाबत नगर परिषदेला निवेदन


अजिंक्या शेडे युवा शेनाची मांगती


वणी रस्ते बनले पार्किंग प्लेस

 

 वणी  ः  शहरातील  राष्ट्रीयीकृत बँक, पतसंस्था व मल्टीस्टेट वित्तीय संस्थांना पार्किंगची व्यवस्थाच नाही. शहरातील जवळपास सर्वच शासकीय बँक, पतसंस्था व मल्टीस्टेट वित्तीय संस्था शहरातील प्रमुख रहदारीच्या मार्गावर आहेत. याठिकाणी येणारे ग्राहक रस्त्यांवरच वाहने पार्क करून तासंतास बँकेचे व्यवहार करतात. त्यामुळे रहदारीला मोठे अडथळे निर्माण होत आहे. रस्त्यांवर दररोज वाहनांचा जाम लागत आहे. शासकीय बँक, पतसंस्था व मल्टीस्टेट वित्तीय संस्था ग्राहकांना पार्किंगची व्यवस्था करून देण्याकडे लक्ष देतांना दिसत नाही. त्यामुळे नगर पालिकेने यावर  तात्काळ कायदेशीर कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे. वाहतूक विभागही वाहन धारकांना शिस्त लावण्यास अपयशी ठरत आहे. बँकेसमोर वाहने शिस्तीत उभे करण्यास सांगणारा कोणताही चौकीदार अथवा कर्मचारी रस्त्यावर उभा राहतांना दिसत नाही. शासकीय बँक, पतसंस्था व मल्टीस्टेट वित्तीय संस्था वाहतूक कोंडीचे कारण बनू लागल्या आहेत. त्यामुळे नगर पालिकेने स्वतः उपाययोजना कराव्या अथवा बँकांना तशा सूचना द्याव्या.
सध्या सण उत्सवाचा काळ सुरु आहे. नवरात्र उत्सव काही दिवसांवरच आला आहे. नंतर दिवाळीसारखा मोठा सण आहे. या काळात नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडतात. नवरात्र उत्सवात भाविकांची रस्त्यांवर मोठी गर्दी उसळलेली असते. रस्ते गर्दीने फुलून निघतात. तेंव्हा रस्त्याने जाणे येणे करणाऱ्या भाविकांना वाहतूक कोंडीचा त्रास होणार नाही याची नगर पालिकेने दक्षता घ्यावी. त्यातच दिवाळी सारखा महत्वाचा सणही तोंडावर आला आहे. दिवाळीच्या खरेदीकरिता नागरिकांची शहरात एकच झुंबड उडतांना दिसते. गावखेड्यातील ही नागरिक शहराच्या ठिकाणी खरेदीला येतात. त्यामुळे शहरातील सर्वच रस्त्यांवर प्रचंड गर्दी असते. तेंव्हा बँकेपुढे नियमबाह्य पद्धतीने लावण्यात आलेली वाहने वाहतूक कोंडीला जबाबदार ठरू शकतात. त्यामुळे नगर पालिकेने रस्त्यांवर असलेल्या राष्ट्रीयीकृत बँक, पतसंस्था व मल्टीस्टेट वित्तीय संस्थेच्या व्यवस्थापकांना पार्किंगची व्यवस्था करण्यास सांगावे अथवा पालिकेने स्वतः उपाययोजना कराव्या. पार्किंगची व्यवस्था नसलेल्या बँक, पतसंस्था व मल्टीस्टेट वित्तीय संस्था शहरात चालविण्यास परवानगी देऊ नये, शहरातील राष्ट्रीयीकृत बँकांसमोर पार्किंग व्यवस्था नसताना रस्त्यावर वाहने उभी करण्यास भाग पडणाऱ्या या बँकांवर दंडात्मक कारवाईची करावी आणि याकडे नगर पालिकेने लक्ष न दिल्यास युवासेने कडुन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. याला सर्वस्वी नगर पालिका जबाबदार राहील.
 सदर प्रतिलिपी देऊन मांगणी करण्यात आली.
1) मा. उपविभागीय पोलीस अधिकारी वणी ,
2) मा. ठाणेदार साहेब पोलीस स्टेशन वणी,
3) मा. उप वाहतूक शाखा वणी,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here