ग्राहक पंचायत भद्रावतीच्या तालुकाध्यक्षपदी बालाजी दांडेकर तर सचिवपदी प्रवीण चिमुरकर

27

ग्राहक पंचायत भद्रावतीच्या तालुकाध्यक्षपदी बालाजी दांडेकर तर सचिवपदी प्रवीण चिमुरकर


भद्रावती तालुका शाखेची नवीन कार्यकारिणी गठीत

भद्रावती : अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत अध्यक्ष डॉ. नारायण मेहरे, विदर्भ प्रांत सचिव नितीन काकडे तसेच चंद्रपूर जिल्हा संघटक वसंत वऱ्हाटे यांच्या सुचनेनुसार अखिल भारतीय ग्राहक पंचायत भद्रावतीची नविन तालुका कार्यकारिणी तयार करण्यात आली आहे.
यावेळी अध्यक्ष म्हणून बालाजी दांडेकर, उपाध्यक्ष मोहन मारगोनवार व शोभा साखरकर, सचिव प्रवीण चिमुरकर, सहसचिव करूणा मोघे, कोषाध्यक्ष सुदर्शन तनगुलवार, संघटनमंत्री शेखर घुमे व शिला आगलावे, प्रसिद्धी प्रमुख वतन लोणे, महिला प्रमुख माया नारळे, मार्गदर्शक वसंत वऱ्हाटे, वामन नामपल्लीवार, पुरूषोत्तम मत्ते तर कार्यकारिणी सदस्य म्हणून गुलाब लोणारे, केशव मेश्राम, विठ्ठल ढवळे, दाजीबा बांबोळे, माधव कौरासे, किशोर सातपुते, शिला चामाटे, गीता जयपूरकर आणि लिला ढवळे यांची निवड करण्यात आली आहे. सदर कार्यकारिणी सर्व सदस्यांच्या उपस्थितीत व वरिष्ठांच्या मार्गदर्शनात तयार करण्यात आली आहे.
ग्राहकांचे प्रश्न मार्गी लावत व समाजपयोगी कार्य करून नविन कार्यकारिणीतील प्रत्येक सदस्य व पदाधिकारी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे कार्य समोर नेतील असा आशावाद यावेळी नवीन कार्यकारिणीतल्या सदस्य व पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला. कार्यकारिणीतील नवनियुक्त सदस्य व पदाधिकाऱ्यांचे सर्वच स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here