आम आदमी पार्टी व १७० भूस्खलनग्रस्त कुटुंब करणार तीव्र आंदोलन…

20

आम आदमी पार्टी व १७० भूस्खलनग्रस्त कुटुंब करणार तीव्र आंदोलन…


घुग्घुस

दिनांक २६/०८/२०२२रोजी अमराई वार्ड क्र.०१ इथे वे.को.ली. वणी क्षेत्र,घुग्घुसच्या चुकीमुळे गजानन मडावी यांच्या राहत्या घराजवळ अंदाजे 70 फूट खड्डा पडला चौकशीमध्ये असं पाहण्यात आले की वे.को.ली द्वारा अंडरग्राउंड माईन्स मध्ये शब्द सॅन्ड फिलिंग करताना भोंगळ कारभार झाला होता आणि याच कारना मुळे खड्डा पडला. या खड्ड्या मुळे मडावी यांचे घर संपूर्ण सामानासोबत आत गेले आणि मालमत्तेची नुकसान झाली सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झाली नाही व तसाच पंचनामा मा. तहसील कार्यालय चंद्रपूर आणि नगरपरिषद घुग्घुस मार्फत करण्यात आले.

सोबतच एकूण १६९ घरांना सुद्धा भूस्खलनचा धोका आहे असे चौकशीत पाहायला मिळाले व त्यांना दुसऱ्या ठिकाणी वेकोलीच्या मदतीने घर तयार करून देऊ असे शासन प्रशासनाने आश्वासन दिले होते परंतु मागील ०२ वर्ष लोटून गेले पण मडावी कुटुंबांना कुठल्याही प्रकारचा मोबदला व आर्थिक मदत मिळाली नाही आणि १६९ परिवाराला पालक मंत्र्यामार्फत आणि तहसीलदार मार्फत आश्वासन देऊन सुद्धा घर मिळाले नाही.

म्हणून १६९ घरांच्या पीडित परिवाराला घेऊन आम आदमी पार्टी तर्फे १८/१०/२०२४ शुक्रवार रोजी दुपारी १२ वाजता पासून वे.को.ली तसेच तहसील कार्यालय आणि सरकार विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे असे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले निवेदन देताना शहर अध्यक्ष अमित बोरकर, उपाध्यक्ष विकास खाडे , युवा अध्यक्ष सचिन सिरसागर, सचिव संदीप पथाडे, रवी शांतलावार, प्रशांत सेनानी, प्रफुल पाझारे, निखिल कामतवार, अनुप नळे, करण बिऱ्हाडे, संतोष सलामे, प्रशांत पाझारे, कुलदीप पाटील, महिला शहर अध्यक्ष उमा तोकलवार, महिला उपाध्यक्ष सोनम शेख, महिला सचिव विपश्यना धनविजय, महिला कोषाध्यक्ष अंजली नगराळे, महिला संघटनमंत्री पुनम वर्मा, रिना पेरपूल्ला, शामला तराला, धम्मदिना नायडू, नईमा शेख, कविता विष्णु भक्त, शोभाताई इत्यादी कार्यकर्ते व भूस्खलनग्रस्त नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here