घुग्घुस : शहरात ६८ वा धम्मचक्र अनुवर्तन दिन शनिवार, १२ ऑक्टोबर रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी आम्रपाली बुद्ध विहार कमेटी, रमाई महिला मंडळ, चक्रवर्ती सम्राट अशोक युथ आम्रपाली वार्ड तथा सर्व बुद्ध विहार मंडळाच्या वतीने शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली आणि तहसील कार्यालयाजवळील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतड्याजवळ मिरवणूकीचे समापन करण्यात आले.
भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, अमोल थेरे, हेमंत पाझारे, धनराज पारखी हे मिरवणुकीत सहभागी झाले त्यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले आणि बौद्ध बांधवांना धम्मचक्र अनुवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. याठिकाणी सामूहिक ध्वजारोहन करण्यात आले.
यावेळी मोठ्या संख्येत बौद्ध समाज बांधव उपस्थित होते.