६८ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त पंचशील बौद्ध विहार घुग्घुस येथे संगीतमय प्रबोधन कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला.

41

६८ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त पंचशील बौद्ध विहार घुग्घुस येथे संगीतमय प्रबोधन कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला.


 घुग्घुस – ६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आज राज्यात साजरा होत आहे. १९५६ साली विजयादशमीच्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसह नागपूर व चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन धर्मातर केले होते.
म्हणून हा दिवस महाराष्ट्रात नवे तर संपूर्ण देशभरात हा दिवस साजरा केला जातो

तसेच चंद्रपूर जिल्ह्य़ातील घुग्घुस इथे आज सुरेश मल्हारी पाईकराव अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा नगर शाखा घुग्घुस यांच्या उपस्थितीत सकाळी नगर परिषद घुग्घुस येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली.

पंचशील बौद्ध विहार घुग्घुस येथे तथागत बुध्द, चक्रवर्ती अशोक सम्राट, महात्मा ज्योतिबा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मोमबत्ती, अगरबत्ती प्रज्वलित करून धम्म ध्वजारोहण करून. सामुहिक बुध्द वंदना घेण्यात आली.
घुग्घुस येथील सर्व बौद्ध विहारातील मिरवणूक पंचशील बौद्ध विहार घुग्घुस इथे एकत्रित येऊन सर्व बौद्ध विहार अध्यक्ष, सचिव सदस्य यांचे सुरेश मल्हारी पाईकराव यांचा हस्ते स्वागत करुन मिरवणूकला सुरूवात झाली. समारोपीय कार्यक्रम जुनी तहसील कार्यालय येथे घेण्यात आला.

महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी / गायक छोटे मिलिंद संच अकोला यांचा सायंकाळी 6 वाजता पंचशील बौद्ध विहार घुग्घुस येथे संगीतमय प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पंचशील बौद्ध विहाराचे बांधकाम सुरू असल्याने गायक छोटे मिलिंद यांनी अखेरचा गाण्याला येणारे धम्मदान हे विहार बांधकाम देण्यात येईल असे आव्हान गायकीतून केले. जमलेले नागरिकांनी अठरा हजार पन्नास रुपये दान दिले
गायक छोटे मिलिंद यांनी ते दान अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव, हेमंत आनंदराव पाझारे, चंद्रगुप्त घागरगुंडे, शरद पाईकराव योगेश नगराळे व जनतेचा समस्त याना सुपूर्त केला.

सुरेश मल्हारी पाईकराव यांनी गायक छोटे मिलिंद यांचे व
जमलेल्या हजारो नागरिकांचे धन्यवाद मानले.
व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली
यावेळेस सुरेश मल्हारी पाईकराव, शरद मल्हारी पाईकराव, हेमंत आनंदराव पाझारे, चंद्रगुप्त घागरगुंडे, वैशालीताई निखाडे अश्विनीताई सातपुते, मायाताई सांड्रावार, रिताताई देशकर, स्मिताताई कांबळे प्रतिमाताई कांबळे रमाबाई सातारडे रवि देशकर जयंत निखाडे बबन वाघमारे ,व समस्त घुग्घुस येथील बौद्ध बांधव उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here