शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष करीत असतात उपसरपंच तर नेहमी मद्यधुंद अवस्थेत ग्रामपंचायत मध्ये येत असल्यामुळे नागरिक प्रचंड आक्रोशीत झालेले आहे व नागरिकांचा संताप हा १५ ऑक्टोंबर २०२४ रोजी दुपारीच्या सुमारास घेण्यात आलेल्या आम सभेत उफाळून आला
या आमसभेत नागरिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त करीत ग्रामपंचायतला पंधरा दिवसाचा अल्टीमेटम दिला आहे
गावातील उर्वरीत विकासकामे येत्या पंधरा दिवसात करण्यात यावे नाही तर सरपंच सचिव व उपसरपंच यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अन्यथा जिल्हा अधिकारी कार्यालय चंद्रपुर येथे तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला
शेणगांव हा समस्याचा माहेरघर झालेला आहे ग्रामपंचायत, गेल्या चार वर्षापासून गावांच्या विकासाच्या कामे बंद टोपलीत टाकण्यात आले बेरोजगारांना रोजगार नाही सर्वत्र घाणेचे सम्राज्य नाली सफाई नाही,पथदिवे बंद अवस्थेत आहे रोडचे कामे होत नाही, ग्रामपंचायत हद्दीतील ज्या सीसीटीव्ही कॅमरे लागलेले आहे ते बंद आहेत. शेणगांव फाटा येथे असलेली पाण्याची चालू असलेली बोरिंग बुजविण्यात आली संतोषी ट्रान्सपोर्ट तर्फे केलेले अतिक्रमण हटविण्यात यावे,शेणगांव फाटा ते शेणगांव पथदिवे लावण्यात यावे, अश्या अनेक समस्याने ग्रस्त शेंनगावच्या समस्या सोडविण्याची मागणी गावकऱ्यांनी केली
याप्रसंगी भास्कर सोनेकर युवानेते काॉग्रेस कमेटी ग्रामीण शेणगांव, निखिल बांदूरकर, सचिन लोनगाडगे, प्रमोद मत्ते, राहुल जेनेकर, सचिन खनके,प्रविण राजुरकर, विकास वैद्य,राजु सोनेकर, नंदकिशोर ठावरी, किशोर मत्ते,विनय तिखट,मिनाबाई बरडे, पोर्णिमा ठावरी,मंगला भिवापूरे, विजय मत्ते,व मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते