*ना.सुधीर मुनगंटीवार यांचा मुल तालुक्यात अद्यायावत आरोग्यसेवेसाठी पुढाकार*
*100 खाटांच्या रुग्णालयाचे थाटात भूमिपूजन*
*107 कोटी 29 लक्ष रुपयांच्या निधीस मान्यता*
*मुल, दि.16 – आरोग्यसेवेच्या बाबतीत मुल तालुक्यात कुठलीही उणीव राहता कामा नये. छोट्या मोठ्या आजारांवरील उपचारासाठी तालुक्याच्या बाहेर पडण्याची गरज पडू नये. यादृष्टीने राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी अद्ययावत आरोग्यसेवा निर्माण करण्यावर भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून मूल तालुक्यासाठी सर्व सुविधायुक्त 100 खाटांच्या रुग्णालयाचे भूमिपूजन करण्यात आले.*
उपजिल्हा रुग्णालय मुल येथिल 100 खाटांचे मुख्य इमारत व निवासस्थानाच्या बांधकामाचे भूमिपूजन कार्यक्रमाला चंद्रकांत आष्ठणकर, प्रभाकर भोयर, अजय गोगुलवार, नंदू रणदिवे, मिलिंद खोब्रागडे, अनिल साखरकर, अविनाश जगताप, प्रशांत बोबाटे, राकेश ठाकरे, किशोर कापगते, मनीषा गांडलेवार, प्रशांत कोहडे, युवराज चावरे, प्रमोद कोकूलवार व इतर भाजप पदाधिकारी व पत्रकार, डॉक्टर, नर्स तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मूलमध्ये 100 खाटांचे सुसज्ज रुग्णालय झाल्यानंतर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची संख्याही वाढणार आहे. रुग्णसेवा करणाऱ्या परिचर, परिचारिकांची पदेही भरण्यात येतील. तांत्रिक पदांची भरती करण्याचा प्रस्ताव देखील आहे. भविष्यात नेत्र रोग्य तज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ अशी वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे निर्माण करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. याशिवाय नवीन रुग्णालयात ना. श्री. मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार विशेष उपचार कक्षही असणार आहे.
रुग्णालयाच्या उभारणीसाठी ना. श्री. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने 107 कोटी 29 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. सध्या मुलचे हे रुग्णालय केवळ 50 खाटांचे आहे. या रुग्णालयाला विशेष बाब म्हणून 100 खाटांचे करण्यात यावे, यासाठी ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला होता. त्यानुसार सरकारने रुग्णालयाच्या विस्ताराला 3 ऑगस्ट 2023 रोजी मान्यता प्रदान केली होती. आता या रुग्णालयाच्या इमारतीचे भूमिपूजन झाले आहे. श्रेणीवर्धन झाल्याने आता या उपजिल्हा रुग्णालयात आणखी 50 खाटा उपलब्ध होणार आहेत.
*उपजिल्हा रुग्णालयात आधुनिक सुविधा* नवीन इमारतीत नेत्र व अस्थिरोग शस्त्रक्रिया देखील होणार आहेत. मुल तालुक्यातील नागरिकांना उपजिल्हा रुग्णालयातच आधुनिक आरोग्यसेवा मिळावी हा ना. श्री. मुनगंटीवार यांचा उद्देशही साध्य होणार आहे. डिजिटल सोनोग्राफी, एक्स-रे आणि प्रयोगशाळेतील जवळपास सर्वच चाचण्या मुलच्या उपजिल्हा रुग्णालयातच लवकरच उपलब्ध होणार आहेत, हे महत्त्वाचे.
*14 वैद्यकीय अधिकारी* मुलच्या नवीन रुग्णालयात बालरोग तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ अशा एकूण 14 वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यासाठी प्रयत्नशील आहे. मुल तालुक्यातील रुग्णांना आजारांवरील उपचारासाठी भटकंती करण्याची गरज पडू नये यासाठी मुल रुग्णालयात सुसज्य वैद्यकीय व्यवस्था व्हावी यासाठी ना. श्री. मुनगंटीवार यांचा प्रयत्न आहे.