lपोलीस स्टेशन- नागभीड जि. चंद्रपूर प्रतिबंधीत असलेला सुगंधित तंम्बाखु बाबत कार्यवाही

19

lपोलीस स्टेशन- नागभीड जि. चंद्रपूर प्रतिबंधीत असलेला सुगंधित तंम्बाखु बाबत कार्यवाही


नागभीड -:पोलीस स्टेशन नागभीड अंतर्गत दि. 20/10/2024 रोजी गोपनिय माहीती वरुन आरोपी जमीर समीर शेख वय 19 वर्ष, जात मुस्लिम, धंदा-पानटपरी दुकाण, रा. शिवनगर वार्ड, नागभीड ता. नागभीड जि. चंद्रपूर याचे राहते घराची महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला सुगंधित तंम्बाखु व पानमसाला बाबत घरझडती घेतली सदर आरोपीचे राहते घरी 1) पांढ-या रंगाच्या एकूण 12 नग चुंगळ्या, प्रत्येकी चुंगली मध्ये सुगंधीत तंबाकुचे लाल रंगाचे एकुण 20 पॉकेट प्रत्येकी पॉकेट 500 ग्रॅम वजनाचे, प्रती पॉकेट किं,700/-रु. प्रमाणे. एकुण कि. 1,68,000/-रु., 2) पांढ-या रंगाच्या एकुण 8 चुंगळ्या, प्रत्येकी चुंगळी मध्ये 11 पॉकेट, प्रत्येकी पॉकेटमध्ये 40 ग्रॅम वजनाचे 12 पाऊच ज्यावर होला तंबाखु ZEN TOBACCO PVT.LTD. असे लिहीलेले. प्रती पॉकेट 600/-रु. प्रमाणे, कि.52,800/-रु., 3) विमल गुटखा पान मसाला चे एकुण 26 पॉकेट प्रत्येकी पॉकेट 126.5 ग्रॅम वजनाचे प्रती पॉकेट कि.200/-रु. प्रमाणे. एकूण कि. 5,200/-रु. 4) विमल पान मसाला मध्ये मिळवुन खाण्याचा वि-1 तंम्बाखु एकुण 26 पॉकेट, प्रती पॉकेट कि. 50/-रु. प्रमाणे. एकुण कि. 1300/-रु. 5) DB SIGGNATURE FINEST PAN MASALA चे एकुण 14 खोके प्रत्येकी खोका 144 ग्रॅम वजनाचा, प्रती खोका कि.500/-रु. प्रमाणे. एकुण कि. 7000/-रु. 6) पान पराग प्रिमियम पान मसाला चे एकूण 55 पॉकेट, प्रत्येकी पॉकेट 96 ग्रॅम वजनाचे, प्रती पॉकेट 150/- रु.प्रमाणे. एकुण कि.8250/-रु. 7) अन्नी गोल्ड स्विट सुपारीचे एकुण 36 पॉकेट, प्रत्येकी पॉकेट 75 ग्रॅम वजनाचे, प्रती पॉकेट कि.90/-रु. प्रमाणे, एकुण कि.3240/-

रु. असा संपुर्ण एकुण मु‌द्देमाल किंमत- 2,45,790/- रु. चा मिळून आला. सदर आरोपीने महाराष्ट्र‌मध्ये प्रतिबंधीत असलेला सुगंधित तंम्बाखु व पानमसाला या अन्नपदार्थाचे

विक्री करीता साठवणुक करुन मा. अन्न सुरक्षा आयुक्त, अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यांची अधि. सुचना क्रं. असुमाअ/अधिसुचना-581/2024/7,12 जुलै 2024 अन्वये उपरोक्त काय‌द्याने दिलेल्या अधिकारानुसार जनहित व जन आरोग्याच्या दृष्टीने काढलेल्या अध्यादेशाचे उलंघन केलेले आहे. तसेच सदर प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखु अन्नपदार्थाचे सेवन केल्याने कर्करोग व मुखरोग व प्रजाननावर विपरीत परिणाम होतात तसेच अतिसेवनामुळे कर्करोग होवु शकतो याची जाणीव असुनही सदर आरोपीने वरील प्रमाणे माल विक्री करीता साठवणुक केल्याचे मिळुन आल्याने सदरचा मुद्देमाल व आरोपीस ताब्यात घेवुन आरोपी विरुध्द पोलीस स्टेशन नागभीड जि. चंद्रपुर येथे अपराध क्र. 339/2024 कलम 30 (2)(a), 26(2)(i), 26(2)(iv), 59 अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006, सह कलम 223,275, 123 भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदर आरोपीस अटक करण्यात आली आहे.

मुमक्का सुदर्शन, पोलीस अधिक्षक चंद्रपुर, रिना जनबंधु, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रपूर,.दिनकर ठोसरे, उप विभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हपूरी, रमाकांत कोकाटे, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन नागभीड यांचे मार्गदर्शनात स.पो.नि. दिलीप पोटभरे, पो.उप.नि. संजय पोंदे, पो.हवा. दिपक कोडापे/2444, पो.अं. अजित शेंडे/2873, पो.अं. रोहीत तुमसरे/21, पो.अं. अमोल देठे/1302 सर्व पो.स्टे. नागभीड यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here