24 तारखेला शक्ती प्रदर्शन करुन सुरेश मल्हारी पाईकराव नामनिर्देशन पत्र दाखल करणार

32

24 तारखेला शक्ती प्रदर्शन करुन सुरेश मल्हारी पाईकराव नामनिर्देशन पत्र दाखल करणार


चंद्रपूर – : चंद्रपूर जिल्ह्य़ातील विधानसभा निवडणुकीचा नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा तारिख जाहीर झाल्या असुन चंद्रपूर विधानसभा क्षेत्र 71 या निर्वाचित क्षेत्रामधुन अपक्ष उमेदवार सुरेश मल्हारी पाईकराव हे 24 तारखेला मोटरसायकल मिरवणूक काडुन शक्ती प्रदर्शन करुन नामनिर्देशन पत्र दाखल करणार आहेत.
घुग्घुस इथुन भव्य मोटरसायकल मिरवणूक काडुन हि मिरवणूक घुग्घुस तिलक नगर, विठ्ठल मंदिर, गांधी चौक, बँक ऑफ इंडिया, बस स्टँड, शेनगाव, येरूर, मोरवा, पडोली, चंद्रपूर श्री छत्रपती शिवाजी महाराज, शहीद बापुराव पुल्लेसुर शेडमाके, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात येणार आहे.
या मोटरसायकल मिरवणूक मध्ये सहकार्यांनी घुग्घुस डॉ. सोनटक्के दवाखान्याजवळ सकाळी 9:00 वाजता उपस्थित राहावे असे चंद्रपूर विधानसभा उमेदवार सुरेश मल्हारी पाईकराव यांनी आव्हान केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here