रयतवारी येथील गुप्ता याचेकडुन अवैधरित्या सुगंधीत तंबाकु स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांनी जप्त केले.

50

रयतवारी येथील गुप्ता याचेकडुन अवैधरित्या सुगंधीत तंबाकु स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांनी जप्त केले.


चंद्रपुर :
दिनांक ०५/११/२०२४ रोजी पोउपनि विनोद भुरले, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर हे पोलीस स्टॉफसह मा. पोलीस अधिक्षक साहेब, चंद्रपुर यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयात प्रोव्हीशन, जुगार रेड, सुगंधीत तंबाकु तसेच इतर अवैध धंदयावर कार्यवाही करणे कामी रवाना होवुन पोलीस स्टेशन, रामनगर परिसरात पेट्रोलीग करीत असतांना मुखबिर व्दारे खबर मिळाली की, नामे अमर गुप्ता रा. स्वतवारी कॉलरी, चंद्रपुर हा त्याचे स्वतवारी कॉलरी येथील किराणा दुकानाचे मागील गोडातुनचे बाजुला लावुन असलेल्या टाटा कंपनीच्या ओमनी चार चाकी वाहनाच्या खाली असलेल्या सुंगधीत तंबाकुनी भरलेल्या पांढ-या रंगाच्या प्लॉस्टीक चुंगडया हया महिला नामे रक्षा ठक्कर, रा. दुर्गापुर, जि. चंद्रपुर ही चालकासह घेवुन आलेल्या चार चाकी टाटा एस कंपनीच्या वानामध्ये भरत आहे अशा खबरे वरून नमुद आरोपीचे गोडावुनचे बाजुला असलेल्या चार चाकी वाहनाचे खाली असलेल्या प्लॉस्टीक चुंगडयांची तपासणी केली असता सुगंधीत तंबाकु असा एकुण १,००,४५०/- रुपयाचा माल मिळुन आल्याने आरोपी अमरजित ध्रुवप्रसाद गुप्ता, रा. रयतवारी कॉलरी, चंद्रपुर तसेच महिला नामे रक्षा ठक्कर, रा. दुर्गापुर, चंद्रपुर यांचेवर पोलीस स्टेशन, रामनगर अप १०५६ २०२४ कलम २२३, २७५, १२३ भान्यास सहकलम ३० (२), २६(२) (अ), ३, ४, ५९ अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन साहेब चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिदाक रिना जनबंधु मॅडम, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोडावार यांचे नेतृत्वात पोउपनि विनोद मुरले, पोहवा/सतिश अवथरे, नापोशि/संतोष येलपुलवार, पोशि/गोपाल आतकुलवार, पोशि/गोपीनाथ बरोटे, सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here