*सुधीरभाऊप्रती लाडक्या बहिणींची माया

18

*सुधीरभाऊप्रती लाडक्या बहिणींची माया!*

*बल्लारपूर विधानसभेतील महिला ना. मुनगंटीवार यांना ओवळत साजरी करत आहेत भाऊबीज..!*

*बल्लारपूर – बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि लाडक्या बहिणींची माया हे एकच समिकरण सध्या बघायला मिळत आहे. सुधीरभाऊंना ओवाळत बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील महिला भाऊबीज साजरी करत आहेत. ज्यांच्या प्रयत्नांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ लाखो महिलांना मिळाला. दीड हजार रुपये बहिणींच्या खात्यात आले. ज्यांच्या प्रयत्नांनीच बहिणींना सुरक्षेची खात्री मिळाली. त्या सुधीरभाऊंना औक्षण करून शुभेच्छा देण्यावरच महिलांचा भर आहे.*

जनतेच्या मनात एवढा सन्मान निर्माण करता येणं हीच आयुष्यातील खरी कमाई… ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी जनसेवेच्या कार्यातून हा सन्मान निर्माण केला म्हणूनच बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील इटोली या लहानशा गावातील मायाबाई चरणदास पिपरे या गरीब बहिणीचा भाऊंचे औंक्षण करताना कंठ दाटून येतो. राजकीय जनसंपर्कात क्वचितच असे प्रसंग वाट्याला येतात. आज सर्वत्र प्रचारसभा सुरू आहेत. अशात राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा भर मात्र जनसंपर्कावर आहे. प्रत्येकाची भेट घेणे, आत्मियतेने विचारपूस करणे, अडचणीत असलेल्यांना मदत करणे हा सुधीरभाऊंचा स्थायीभाव. बल्लारपूरचे आमदार आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सातत्याने जनसेवेची जबाबदारी कर्तव्य भावनेने ते पार पाडतात. जात, पात, धर्म, पंथ या पलीकडे जाऊन काम करणे हेच भाऊंचं जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण करण्यामागील गुपीत म्हणावं लागेल.

चंद्रपूर हा महाराष्ट्रातील शेवटच्या टोकावरचा जिल्हा असल्यामुळे अनेकांची या जिल्ह्याविषयी मागास जिल्हा अशीच धारणा. पण इथे भेट देणारा प्रत्येकच जण अवाक् होऊन जातो जेव्हा इथल्या प्रकल्पांवर नजर फिरवतो. तरुण, महिलांच्या हाताला काम, उपलब्ध संसाधातून नवनिर्मितीचे प्रशिक्षण देऊन स्थानिकांच्या हाताला कुशलतेचे बळ, नैसर्गिक संपदेचे संरक्षण करतानाच त्यावर आधारित जैवविविधता प्रकल्पासारखी संकल्पना प्रत्यक्षात आणणे अशा अनेक कामांची यादी मोठी आहे.

अडल्या-नडल्यांना मदत करणे हे सुधीरभाऊंच्या स्वभावातच… तीन-चार वर्षाच्या चिमुकल्या बालकांना हृदयाचे गंभीर आजार असल्याने गरीब पालकांची होत असलेली वाताहत न पाहावू शकलेल्या या नेत्यानं अशा अनेक बालकांचे मुंबईतील नामांकीत हॉस्पीटलमध्ये मोफत निदान आणि उपचार करून बालकांना नवजीवन दिलं. एरवी राजकीय नेत्यांत दुर्मीळ वाटणारी संवेदनशीलता सुधीरभाऊंच्या वाणीत, कृतीत आणि स्वभावातून झिरपत असते. त्यातूनच मग अशा बहिणी पुढे येऊन भाऊंप्रति कृतज्ञता व्यक्त करतात.

या अशा लाखों बहिणींच्या सन्मानार्थ राज्यातील महायुती सरकारनं सुरू केलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महिलांना सक्षमतेचा आत्मविश्वास मिळाला. योजना सुरू झाली असताना अनेक भ्रम पसरवले गेले. या काळात सुधीरभाऊंनी चंद्रपूर जिल्ह्यातील ४ लाख ७२ हजार बहिणींचे अर्ज यशस्वीरित्या भरून घेण्यासाठी यंत्रणा उभी केली आणि या बहिणींना लाभ मिळवून दिला. या योजनेचे स्वरूप आता अधिक व्यापक होण्याच्या दृष्टीने मोठे पाऊल सरकारने उचलले आहे. येत्या काळात लाडक्या बहिणींना १५०० ऐवजी २१०० रुपये प्रतिमाह म्हणजे २५२०० रुपये दर वर्षाला मिळणार आहेत. म्हणजे आता लाडकी बहिण ही सक्षमच होणार नाही तर कुटुंबाचा भक्कम आधार सुद्धा होणार आहे. सुधीरभाऊंसारखे नेतृत्व नेहमीच या बहिणींच्या स्वावलंबनासाठी भक्कमपणे उभे राहिल्याचे दिसून आले.

येणारा काळ हा अनेक नव्या आकांक्षांना बळ देणारा ठरणार आहे. अनेक बहिणींच्या डोळ्यात त्याच आशेचे पाणी तरळतंय… बहिणींच्या डोळ्यात तरळणारं पाणी त्यांच्या स्वाभिमानाला नवी ऊर्जा देणारं ठरलं तर या पाण्याला आनंदाश्रू म्हणता येईल. अन्यथा या आशा, आकांक्षा, अपेक्षांना धक्का देऊन बहिणींच्या डोळ्यातील पाणी वेदनेची किनार ठरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here