*सावली शहर वासियांचा विजयी निर्धार ; काँग्रेसच म्हणू ,काँग्रेसच आणू.*

12

*सावली शहर वासियांचा विजयी निर्धार ; काँग्रेसच म्हणू ,काँग्रेसच आणू.*

*प्रचारसभेत व्हीजेएनटी काँग्रेस प्रदेश अध्यक्षा ऍड.पल्लवीताई रेनके तथा युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस आद.शिवानीताई वडेट्टीवार यांचे मार्गदर्शन*

विशेष आकर्षण राष्ट्रीय प्रबोधनकार मा.अनिरुद्ध वनकर यांचा शिवराय ते भीमराय वादळंवारा संगीतमय जलसा*

दिनांक ०८ नोव्हेंबर २०२४ जुनी नगरपंचायत,गुजरी परिसर सावली येथे व्हीजेएनटी काँग्रेस प्रदेश अध्यक्षा ऍड.पल्लवीताई रेनके तथा युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस आद.शिवानीताई वडेट्टीवार यांची ब्रम्हपुरी- सावली- सिंदेवाही विधानसभा क्षेत्राचे उमदेवार मा.विजयभाऊ वडेट्टीवार साहेब यांचा प्रचारार्थ प्रचार सभा तसेच सुप्रसिद्ध गायक राष्ट्रीय प्रबोधनकार मा.अनिरुद्ध वनकर यांचा शिवराय ते भीमराय वादळंवारा संगीतमय जलसा घेण्यात आला.

सावली येथे शहरवासीयांशी संवाद साधत त्यांच्या पंजा निशाणीना मतदान करून प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आद.शिवानीताई वडेट्टीवार यांनी आवाहन केले.तसेच व्हीजेएनटी प्रदेश अध्यक्षा ऍड.पल्लवीताई रेनके यांनी सुद्धा उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले.

या निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांमध्ये अतिशय आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण दिसत आहे. विजयभाऊ सर्वांना सोबत घेत विकास साधणारे नेतृत्व म्हणून कार्य करत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आम्ही भरभरून मतं देत त्यांना विजयी करणार असल्याच्या भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.

यावेळी सावली शहर अध्यक्ष व नगरसेवक मा.विजय मुत्यालवार,नगराध्यक्ष लताताई लाकडे, प्रमुख अतिथी सामाजिक न्याय विभागाचे कार्याध्यक्ष बादल गायकवाड,माजी सभापती प.स.तथा व्हीजेएनटी काँग्रेस जिल्हाध्यक्ष चंद्रपूर मा.विजय कोरेवार,उपनगराध्यक्ष मा.संदीप पुण्यपकर,जेष्ठ काँग्रेस पदाधिकारी मा.प्रकाश पाटील राईंचवार,सामाजिक कार्यकर्ते मा.गोपाल रायपूरे, युवा शहर अध्यक्ष मा.अमर कोणपत्तीवार, व सर्व नगरसेवक,पदाधिकारी, कार्यकर्ते,शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here