भिसी येथे अवैद्य सुगंधित तंबाखू विक्रीकरिता बाळगणाऱ्या विरुद्ध कारवाई*
भिसी:
दिनांक 17/11/24 रोजी शासनाने प्रतिबंधीत केलेला सुगंधित तंबाखू अवैद्यरित्या विक्री/वाहतूक करणार आहे, अश्या गोपनीय माहिती करून पोलिस स्टेशन भिसि हद्दीत शासनाने प्रतिबंधीत केलेला सुगंधित तंबाखू अवैद्यरित्या विक्री/ वाहतूक करणारा टाटा Harrier चार चाकी गाडी क्रमांक MH 44 S 3838 चा पाठलाग केला असता त्याचा चालक गाडी सोडून पळून गेल्याने अज्ञात चालक यांचे विरुद्ध कारवाई केली असून सदर कारवाई मध्ये
1) इगल सुगंधित तंबाखू 400 ग्रॅम चे एक पाकीट असे एकूण 105 पाकीट एकूण 42 किलो किं. 56700/_ रु.
2) इगल सुगंधित तंबाखू ग्रॅम चे एक पाकीट असे एकूण 75 पाकीट एकूण 75 किलो किं. 1,12,500/_ रु.
3) होला सुगंधित तंबाखू 1000 ग्रॅम चे एक पाकीट असे एकूण 155 पाकीट एकूण 155 किलो किं. 1,27,100/_ रु.
4) पान पराग प्रीमियम मसाला एकूण 80 पाकीट एकूण 8 किलो किं. 10,240/_ रु.
5) टाटा Harrier वाहन क्र. MH 44 S 3838 किमती 15,00,000 रूपये
असा एकूण 17,55,440 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून पोलिस स्टेशन भीसी येथे अपराध क्र. /24 कलम 223, 275 भा. ना. सं. सहकलम 30(2), 26(2)(अ), 3, 4, 59(1) अन्नसुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 प्रमाणे अज्ञात वाहन चालक याचे विरुद्ध गून्हा नोंद केला…