गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्या कार्यकर्त्याचे घरून ६० लाख रक्कम जप्त
*कुठे नेऊन ठेवला राजुरा मतदारसंघ माझा*
गडचांदूर, दिनांक २० नोव्हेंबर – राजुरा विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार देवराव भोंगळे यांनी मतदारांना आमिष देण्यासाठी ६० लाखांची रोकड लपवून ठेवली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने तक्रार केल्यानंतर निवडणूक आयोग प्रशासनाने रात्री उशिरा गडचांदूर येथील एका संशयित घरावर धाड टाकत ही रक्कम जप्त केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राजुरा विधानसभा प्रमुख अरुण निमजे यांनी आयोगाकडे तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. तक्रारीत संपूर्ण विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावात बाहेरील महिला – पुरुष व बाऊंसर नेमून मतदारांना पैसे वाटप करण्याचा कट रचला जात असल्याचे म्हंटले आहे. निवडणूक आयोगाच्या टीमने ही मोठी कारवाई केली. जप्त केलेली रक्कम निवडणूक आयोगाच्या ताब्यात देण्यात आली असून, या घटनेने निवडणुकीच्या निष्पक्षतेवर मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या कुटील नियतीचा पर्दाफाश झाला आहे. भाजप उमेदवाराच्या कार्यकर्त्यांकडे सापडलेला मोठ्या रक्कमेची चर्चा संपुर्ण मतदारसंघात सुरू असून भाजपची मात्र ऐन मतदानाच्या रात्री चांगलीच किरकीरी झाली आहे. या घटनेमुळे राजुरा विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापले आहे.