धान उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या – ना. श्री. सुधीर मुनगंटीवार
ना. मुनगंटीवार यांचे कृषी विभाग प्रधान सचिव तसेच मदत व पुनर्वसन सहसचिवांना निर्देश
शेतकऱ्यांप्रती ना. सुधीर मुनगंटीवार यांची संवेदनशीलता
*चंद्रपूर, दि. 28 : चंद्रपूर जिल्ह्यात धान पिकावर मोठ्या प्रमाणात लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने काढणीच्या वेळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या अनुषंगाने, पुढे सर्वेक्षण करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या दृष्टीने ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी कृषी विभाग प्रधान सचिव जयश्री भोज तसेच मदत व पुनर्वसन विभागाचे सहसचिव कैलास गायकवाड यांच्या सोबत बैठक घेत याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. धान उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याचे आदेशही ना. श्री. मुनगंटीवार यांनी दिले.*
जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी लष्करी अळी तसेच इतर किडींच्या प्रादुर्भावामुळे हवालदिल झाला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक संकटाने हिरावून घेतला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदतीची आवश्यकता असून सदर नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावी. शेतकऱ्यांची निकड लक्षात घेता तातडीने आर्थिक मदत करण्याबाबत उचित कार्यवाही करण्याचे निर्देश देखील ना. सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रालय येथे बैठकीत संबधित अधिकारी यांना दिले.
*प्रचाराच्या रणधुमाळीतही पाठपुरावा* नुकतीच विधानसभा निवडणूक आटोपली. ना. सुधीर मुनगंटीवार हे बल्लारपूर विधानसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार होते. प्रचार, जाहिरसभा, प्रत्यक्ष भेटीमध्ये व्यस्त असतानाही त्यांनी प्रधान सचिव यांना पत्र लिहून नुकसानग्रस्त धान उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती अवगत केली होती. आता या संदर्भात आढावा घेत ताबडतोब नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासंदर्भात निर्देश दिले.
*शेतकऱ्यांप्रती संवेदनशील* ना. श्री. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. ना. श्री. मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची विक्रमी 202 कोटीची रक्कम मिळू शकली. शेतकऱ्याच्या धानाला 20 हजार रुपये हेक्टरी बोनस देऊन भात उत्पादक शेतकऱ्याला न्याय देण्याचे काम त्यांनी केले. सदैव शेतकऱ्यांप्रती ना. मुनगंटीवार संवेदनशील असतात, हे विशेष.