सर्वसामान्यांच्या हक्कासाठी सातत्याने संघर्ष करू : सुभाष धोटे.
कोरपना, गडचांदूर येथे काँग्रेस तथा महाविकास आघाडीची चिंतन बैठक संपन्न.
कोरपना (ता.प्र) :– क्षेत्रातील सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय्य हक्कासाठी, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार युवा, महिला, कृषी, शिक्षण, आरोग्य आणि क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सातत्याने संघर्ष करू, काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने या कामात पुढाकार घेतला पाहिजे असे मत माजी आमदार सुभाष धोटे यांनी व्यक्त केले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कशा पद्धतीने यंत्रणा हाताशी धरून काय काय कारनामे झालेत हे सर्वश्रुत आहे. मात्र आता इथून पुढे आपण सर्वांनी सर्व सामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी खंबीरपणे उभे राहून हा लढा अधिक तीव्र करू असे मत श्रीकृष्ण सभागृह, कोरपना आणि जेष्ठ नागरिक सभागृह, गडचांदूर येथे काँग्रेस तथा महाविकास आघाडी द्वारा आयोजित चिंतन बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी काँग्रेस नेते विजयराव बावणे, विठ्ठलराव थिपे, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, राष्ट्रवादीचे अरुणभाऊ निमजे, काँ. तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, शिवसेनेचे सागर ठाकूरवार, अशोकराव बावणे, नगराध्यक्षा सविताताई टेकाम, श्यामबाबु रणदिवे, संभाजी कोवे, सुरेश मालेकर, वहाब भाई, रसूल पटेल, विजय ठाकूरवार, नोगराज मंगरूळकर, हंसराज चौधरी, नामदेव येरणे, धनंजय गोरे, रोफ खान वजीर खान, नगरसेवक पापय्या पोन्नमवार, जयश्री ताकसांडे, अर्चना वांढरे, सचिन भोयर, प्रा. आशिष देरकर, नितीन बावणे, इरफान शेख, निसार शेख, मनोहर चन्ने, प्रशांत लोडे, विनोद नवले, संजय रणदिवे, शिवकुमार राठी, संतोष महाडोळे, शैलेश लोखंडे, विजय जुलमे, बाबा पुडके, किरण एकरे, उमेश राजूरकर, प्रीतम सातपुते, महादेव हेपट, राकेश शेंद्रे, अजय लांजेकर यासह काँग्रेस, राष्ट्रवादी (श. प), शिवसेना (उभाठा) यासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.