पोलीस रेकॉर्डवरील आरोपीकडून पिस्टल (बंदुक) सहीत ०४ जिवंत काडतुस जप्त
स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही
चंद्रपुर ; दिनांक ०४/१२/२०२४ रोजी पोउपनि, विनोद भुरले, पोउपनि, संतोष निंभोरकर, स्यानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर हे पोलीस स्टॉफसह मा. पोलीस अधिक्षक साहेब, चंद्रपुर यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयात प्रोव्हीशन, जुगार रेड, सुगंधीत तंबाकु तसेच इतर अवैध धंदयावर कार्यवाही करणे कामी रवाना होवुन पोलीस स्टेशन, पडोली परिसरात पेट्रोलींग करीत असतांना मुखबिर व्दारे खबर मिळाली की, नामे राकेश चंद्रय्या माटला, वय-२८ वर्ष, रा. तिलकनगर, अमराई वार्ड, घुग्घुस, ता. जि. चंद्रपुर हा स्वताचे ताब्यात अवैधरित्या अग्नीशस्त्र व जिवंत काडतुस बाळगुन मौजा घुघ्घुस च्या दिशेने वाहनाने जाणार आहे. सदर माहितीवरुन पोस्टे पडोली हददीतील मुख्य चौकात नाकाबंदी लावून तसेच सापळा रचुन आरोपीस ताब्यात घेवून त्याचेकडून एक देशी बनावटीची पिस्टल (बंदुक) सहीत ०४ जिवंत काडतुस जप्त करण्यात आले. सदर आरोपीविरुदध पोस्टे पडोली येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढिल तपास स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर करीत आहे.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन साहेब चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पोउपनि, संतोष निंभोरकर, पोहवा / किशोर वैरागडे, पोहवा. नितेश महात्मे, पोहवा. दिपक डोंगरे, पोहवा. सतिश अवथरे, पोहवा. रजनिकांत पुठठावार, नापोशि/संतोष येलपुलवार, पोशि/गोपाल आतकुलवार, पोशि/गोपीनाथ नरोटे, चापोहवा /दिनेश अराडे, सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.