काम करताना सुरक्षेला प्राधान्य: उपक्षेत्रीय प्रबंधक संजय मिश्रा hu
बेलोरा-नायगाव खाणीत सुरक्षा पंधरवड्याची सांगता.
घुग्घुस :- कोळसा खाणीत काम करीत असलेल्या प्रत्येक कामगाराला विविध धोक्यांना सामोरे जावे लागते. मात्र खाणितील कोळसा उत्पादनाचे उद्दिष्ट साध्य करीत असताना कामगारांची सुरक्षितता प्रथम जपायला पाहिजे. हे लक्षात घेऊन खाणीत काम करताना कामगारांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य दिल्या जात असल्याचे मत निलजई उपक्षेत्रिय प्रबंधक संजय मिश्रा यांनी व्यक्त केले. वेकोली वनी क्षेत्राच्या बेलोरा-नायगाव कोळसा खाणीत वार्षिक खाण सुरक्षा पंधरवड्याची सांगता करण्यात आली. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपक्षेत्रिय प्रबंधक संजय मिश्रा,संजीव रेड्डी, ए. एस. दुबे, एम. आर. पलावत, प्रमोद चव्हाण, थोटा मुरली, नवीनकुमार रेड्डी, नागेंद्रकुमार, खान प्रबंधक संदीप वागले आदी मान्यवर उपस्थित होते. सुरक्षा पंधरवड्यात ए.एस. दुबे यांच्या नेतृत्वात एम. आर. पलावत, प्रमोद चव्हाण, थोटा मुरली व नवीनकुमार रेड्डी सहभागी असलेल्या पथकाने खाणीतील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली.प्रारंभी खान परिसरात सुरक्षा ध्वज फडकविण्यात आला. त्यानंतर मशाल प्रज्वलित करून उपस्थित कामगारांनी सुरक्षा शपथ घेतली. खाणित उत्कृष्ट काम करणारे कामगार बाळा निब्रड, विनोद हटकर, सुधाकर चोखारी, अशोक पानपट्टे, सुनील बिपटे, प्रफुल इखारे, प्रज्ञावंत लोणारे, शंकर महतो आदी कामगारांना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप वागले यांनी संचालन प्रदीप कुमार विश्वकर्मा व प्रफुल ईखारे यांनी तर आभार सुरक्षा अधिकारी अनिल बोर्डे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संकेत खोकले, सुनील बिपटे, प्रज्ञावंत लोणारे, निलेश बारचने,राहुल राऊत, निखिल दुर्गे आदींनी सहकार्य केले.