गौतम नगर वासीयांकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

40

गौतम नगर वासीयांकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादनhu


अशोका बुद्ध विहार आणि तथागत बुद्ध विहार यांची संयुक्त “कँडल मार्च”


भद्रावती, दि. ०७ : येथील गौतम नगर वासीयांकडून दि.०६ डिसेंबर ला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त “कँडल मार्च” काढून अभिवादन करण्यात आले.

प्रथम महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून बुद्ध वंदना घेण्यात आली. गौतम नगर येथील अशोका बुद्ध विहार, स्नेहल नगर येथील तथागत बुद्ध विहार आणि छत्रपती नगर येथील नागरिकांनी गौतम नगर ते आंबेडकर पुतळ्यापर्यंत संयुक्तपणे शांततापूर्ण, शिस्तबद्ध पद्धतीने “कँडल मार्च” काढला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या पुतळ्याला त्रिवार वंदन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी तिन्ही विहार परिसरातील बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here