ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा येथे राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रम अतिउत्साही साजर
वरोरा :
दिनांक ७ डिसेंबर २०२४ ला उपजिल्हा रुग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमांचे उद्घाटन श्रिमती प्रतिभाताई बाळु भाऊ धानोरकर खासदार यांनी केले. डॉ राबर्ट काॅक यांच्या फोटोचे पूजन करून माल्यार्पण करुन दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.व सर्व उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.तसेच अंगणवाडी सेविका यांनी स्वागत गित गावुन स्वागत केले.या १०० दिवस चालणाऱ्या कार्यक्रमाचे ऊद्घघाटिय प्रास्ताविक डॉ ललीत कुमार पटले यांनी केले.सर्वांच्या उपस्थितीत शपथ देण्यात आली.प्रतिभाताई धानोरकर यांनी ४ व्हानला हिरवी झेंडी देवुन वाहन लाभार्थ्यांच्या व उपस्थितांच्या सेवेसाठी सुपूर्त केले.क्षयरोगाविषयी मार्गदर्शन केले.व फ्रि किट वाटप करनार हे सांगितले व बाकिंनी पण किट वाटप करावे हे आव्हान केले.डाॅ अशोक कटारे यांनी मार्गदर्शन केले.सुत्र संचालन सोनाली राईसपाईले व आभारप्रदर्शन डॉ प्रफ्फूल खूजे वैद्यकीय अधीक्षक यांनी केले.या कार्यक्रमासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते व सर्वांनी सहभाग नोंदविला. जनिथ चंद्रा ,डाॅ महादेवराव चिंचोळे जिल्हा शल्य चिकित्सक,डाॅ.पराग जिवतोडे, डॉ बोरकर, उपस्थित होते या कार्यक्रमाला मेहनत वंदना विनोद बरडे अधीसेवीका,व्रुशाली देहारकर अप.,नंदा सानप अप.,साक्षि किन्नाके, हर्षा बालपांडे अप.रुतुजा जाईभाये अप. लक्ष्मीकांत ताले,सुमीत ईत्यादी अधिकारी व कर्मचारी यांनी मेहनत घेतली.टि.बि. हारेग,देश जितेगा अश्या घोषणा देवून रुग्णांमध्ये उत्साहात भरण्यात आला.सकारात्मक विचारसरणीवर भर देण्यात आला.औषधोपचार घेण्यावर व जिवन शैली वर भर देण्यात आला.१० रुग्णांना फ्रि सकस व पौष्टिक, संतुलित आहार किटचे खासदारांच्या हस्ते वाटप करण्यात आले.