घुग्घुस शहराच्या विकासासाठी नवा अध्याय: प्रधानमंत्री शहरी आवास योजना 2.0 मध्ये घुग्घुसचा समावेश –

18

आमदार किशोर भाऊ जोरगेवार यांचे अथक प्रयत्न

घुग्घुस: जनतेच्या कल्याणासाठी नेहमीच आग्रही राहणारे आमदार किशोर भाऊ जोर्गेवार यांनी घुग्घुस शहराच्या विकासासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे प्रधानमंत्री शहरी आवास योजना 2.0 मध्ये घुग्घुसचा समावेश करण्यात यश आले आहे.

ही योजना घुग्घुससारख्या प्रगतीशील शहरासाठी एक सुवर्णसंधी ठरणार आहे. योजना अंतर्गत, शहरातील प्रत्येक कुटुंबाला हक्काचे छत देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

आमदार किशोर भाऊ जोर्गेवार यांची ही संकल्पना जनतेच्या आधारावरच पूर्णत्वास नेण्याचा निर्धार आहे. दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर, त्यांनी आपल्या कार्यकाळाची सुरुवात घुग्घुसच्या जनतेशी थेट संवाद साधून केली आहे. त्यांनी नागरिकांशी त्यांच्या समस्यांवर चर्चा केली आणि विकासाच्या पुढील दिशा ठरवण्यासाठी जनतेचे मत जाणून घेतले.

घुग्घुसच्या जनतेसाठी ही भेट विशेष महत्त्वाची होती, कारण या भेटीद्वारे आमदारांनी आपली लोकनिष्ठा आणि घुग्घुसच्या विकासासाठी असलेली तळमळ पुन्हा अधोरेखित केली आहे. प्रधानमंत्री शहरी आवास योजना 2.0 च्या माध्यमातून येत्या काळात अनेक प्रकल्प राबवले जाणार असून, त्याचा थेट फायदा घुग्घुसच्या सर्वसामान्य जनतेला होईल.

आमदार किशोर भाऊ जोर्गेवार यांनी या यशाचे श्रेय घुग्घुसच्या जनतेला दिले असून, त्यांनी सांगितले की, “तुमच्या विश्वासामुळेच मी ही योजना शहरासाठी घेऊन येऊ शकलो. आगामी काळात घुग्घुसचा सर्वांगीण विकास हीच माझी प्राथमिकता राहील.”

या योजनेंतर्गत घुग्घुसमध्ये घरे, पायाभूत सुविधा, स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात सुधारणा करण्यात येणार आहेत. ही योजना पूर्णतः लागू झाल्यानंतर घुग्घुस एक आदर्श शहर म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

– कार्यालय, आमदार किशोर भाऊ जोर्गेवार
(घुग्घुसच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here