भद्रावती :-भद्रावती तालुक्यात होत असलेल्या अवैध गौण खनिज वाहतुकीला आळा बसावा, या उद्देशाने तहसीलदार राजेशभांडारकर यांनी मोहीम सुरू केली आहे. त्या अंतर्गत गौण खनिजपथकाद्वारे कारवाईचे सत्र सुरू आहे.
यात, शुक्रवार दि.13 डिसेंबर रोजी सकाळी 4,30वाजता शिंदे पेट्रोल पंप जवळ वाहन क्रमांक MH-34 BG6933 हायवा ट्रक मध्ये असलेल्या चार ब्रास रेती ची कारवाई तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या नेतृत्वात गौण खनिज पथक मंडळ अधिकारीअनिल दडमल तलाठी खुशाल मस्के, तलाठी परेश मैदमवार, तलाठी दिनेश भिसी कर यांनी कारवाई केली जितेंद्र प्रकाश अलोने यास अवैद्य रेतीची विचारपूस केली असता, सदर हे वाहन मालक विठ्ठल नानाजी रासेकर राहणार चंद्रपूर यांचे असून अवैद्यरित्या वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रकला ताब्यात घेण्यात आले सदर ट्रॅक्टर तहसीलकार्यालयाच्या प्रांगणात लावण्यात आले .
अवैधरित्यारेती वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रक ताब्यात घेण्यात आले असुन हे ट्रॅक्टर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात लावण्यात आले आहे गौण खनिज पथकाद्वारे एका महिन्यात चारवाहनावर कारवाई करण्यात आलेली आहे. लाखोंचा वर दंड आकारण्यात आलेली आहे,यामुळे अवैद्य रेती तस्कराचे धाबे दणाणले आहे