*सावली तालुका व शहर कमिटीतर्फे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा अभिष्टचिंतन सोहळा साजरा*
*सावली येथे रक्तदान शिबीर,नागरी सत्कार, लाडू तुला व विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन*
सावली तालुका व शहर काँग्रेस कमिटीतर्फे राज्याचे माजी विरोधी पक्षनेते, काँग्रेस नेते, तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार तसेच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानीताई वडेट्टीवार यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्याने रक्तदान, नागरी सत्कार, लाडू तुला व संगीत रजनी यासारख्या विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.आमदार विजय वडेट्टीवार यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून विजयाची हॅट्रिक साधली व सर्वाधिक लीड ५९५० ही सावली तालुक्यातील असून आज त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून व विजयानंतर प्रथम आगमनाप्रीत्यर्थ सावली तालुका तथा शहर तसेच काँग्रेसच्या सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनच्या वतीने भव्य नागरी सत्कार व विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सावली येथे आज काँग्रेसने नेते आ.विजय वडेट्टीवार यांचे आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी करून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.व महात्मा फुले चौक परिसर ते गुजरी चौक सावली इथ पर्यंत विजय रॅली काढण्यात आली.आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्या दरम्यान केक कापून तसेच मिठाईचे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाभरातून आलेले काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते यांनी काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांचा हार,शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. याआधी ११ डिसेंबरला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यात पार पडलेल्या रक्तदान शिबिरात ६७ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. तर काँग्रेस कार्यकर्ते तथा पदाधिकारी यांच्या वतीने आयोजित वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी केक कापून तसेच शाल व श्रीफळ देऊन भव्य नागरी सत्कार करण्यात आला यावेळी सावली तालुका तसेच जिल्हा भरातून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांचा सत्कार करून शुभेच्छांचा वर्षाव केला.
आयोजित कार्यक्रमास आरमोरी विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार रामदास मसराम,माजी बांधकाम सभापती दिनेश पाटील चिटणुरवार,माजी जिल्हा परिषद सदस्य गडचिरोली ऍड.राम मेश्राम,तालुका अध्यक्ष नितीन गोहने,ब्रम्हपुरी तालुका अध्यक्ष खेमराज तिडके,महिला तालुका अध्यक्षा सौ.उषाताई भोयर,शहराध्यक्ष व नगरसेवक विजय मुत्यालवार,माजी पंचायत समिती सदस्य मूल प्रकाश पाटील राईंचवार,नगराध्यक्ष सौ.लताताई लाकडे,उपनगराध्यक्ष संदीप पुण्यपकार,माजी सभापती प.स.राकेश पाटील गड्डमवार,माजी सभापती प.स.विजय कोरेवार,माजी सभापती प.स.कृष्णा राऊत,युवा तालुका अध्यक्ष किशोर कारडे, विधानसभा उपाध्यक्ष नितीन दुवावार,युवा शहर अध्यक्ष अमर कोणपत्तीवार,महिला शहर अध्यक्षा सौ.भारती चौधरी आदी मंचावर उपस्थित होते.
तालुका काँग्रेस कमिटी तथा शहर काँग्रेस कमिटी तसेच काँग्रेस कमिटीचे सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी नगरपंचायत पदाधिकारी, नगरसेवक व बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. तर यावेळी शेकडोंच्या संख्येने आयोजित कार्यक्रमास नागरिकांनी हजेरी लावली.कार्यक्रमाचे प्रस्ताविक तालुका अध्यक्ष नितीन गोहने,तर संचालन विजय गायकवाड,शेखर ,तर आभार कृष्णा राऊत यांनी मानले.
*हा विजय माझा एकट्याचा नसून तो माझा पदाधिकारी ,कार्यकर्ता व जनसामान्यांचा आहे मी सदैव त्यांचा ऋणी – आ. विजय वडेट्टीवार*
ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रामध्ये सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून विजयाची हॅट्रिक साधली व सर्वाधिक लीड ५९५० ही सावली तालुक्यातील असून मला जनतेने आशीर्वाद रुपी प्रेम देऊन लोकप्रतिनिधित्वाची संधी दिली. त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास व अतूट प्रेम याच्या बळावर मी क्षेत्राच्या विकासाकरिता सर्वतोपरी प्रयत्न केले तसेच आगामी काळातही करीत राहील.ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकासासाठी मी कटीबद्ध असून आवशक तो निधी खेचून आणेल,माझ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रत्येक कार्य हिरीरीने सहभाग घेऊन मला साथ दिली. तसेच येथील जनतेने मला मतदान रुपी प्रेम देऊन माझे हात बळकट केले. जनतेने दिलेले हे बळ आणि लढण्यासाठी माझ्यात निर्माण केलेले सामर्थ्य या अमूल्य प्रेमाचा मी सदैव ऋणी राहील,ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील सावली,ब्रम्हपुरी व सिंदेवाही तालुक्याचा विकासत्मक चेहरा बदल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,आपल्या मतारूपी आशीर्वादाने नव्या ऊर्जेने काम करू असे प्रतिपादन राज्याचें माजी विरोधी पक्षनेते , काँग्रेस नेते,तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केले.