येणाऱ्या काळात समाजामध्ये प्रबोधनाची चळवळ उभी करू :- गजानन पाटील जूमनाके

43

येणाऱ्या काळात समाजामध्ये प्रबोधनाची चळवळ उभी करू :- गजानन पाटील जूमनाके


उपरवाही येथे आदिवासी समाजाचा समाज प्रबोधन मेळावा संपन्न


कोरपना :- विखुरलेल्या समाजाला संघटित करून, समाजामध्ये सामाजिक, राजकीय, शैक्षणिक उंची प्रगतशील करण्यासाठी समाजामध्ये प्रबोधनाची चळवळ उभी करण्याचा मानस गोंडवाना गणतंत्र पार्टी राजुरा विधानसभा अध्यक्ष गजानन पाटील जुमनाके यांनी व्यक्त केला आहे, ते मौजा उपरवाही येथे आदिवासी समाज प्रबोधन मेळाव्यात बोलत होते.

पुढे जूमनाके बोलताना आदिवासी समाज विखुरलेला समाज असल्याचा ठपका आहे, तो पुसून काढण्यासाठी समाजाला संघटित होणे काळाची गरज आहे, त्यासाठी समाजाला वेळोवेळी मार्गदर्शनाची गरज असल्याचे मत ही त्यांनी या प्रसंगी व्यक्त केले.

उपरवाही येथे दरवर्षी सल्लाशक्ती स्थापन दिनानिमित्त कोयापूनेम उस्तव समितीच्या वतीने समाज प्रबोधन मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते या ही वर्षी या कार्यक्रमाचे उपरवाही येथे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी गावातून रॅली काढून समाज प्रबोधन मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.

यावेळी मंचावर ग्राम आरोग्य सेना फाऊंडेशन चे अध्यक्ष डॉ. प्रवीण येरमे, डॉ. शारदा येरमे, गोंडीयन विचारवंत रवींद्र कोवे महाराज, जिवती नगरपंचायतीचे नगरसेवक ममताजी जाधव, शिक्षक संदीपकुमार पोरते, मारोती सोयाम, गोंडवाना जंगोम दल चे जिल्हाध्यक्ष वनपाल सोयाम, सामजिक कार्यकर्ते परशुराम तोडसाम, संजय सोयाम, प्रकाश शेडमाके, संदीप पंधरे, संकेत कुळमेथे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी सीताराम वेलादी, भीमराव आलाम, गुणवंत तलांडे, अरुणा पेंदोर इत्यादींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here