घुग्घूस : शहरातील वेकोली कॉलनी व वस्ती भागाला जोडणारा वेकोलीच्या न्यू कोल सायंडींग वरील रेल्वेचा लोखंडी पूल हा जीर्ण झाल्याने सुरक्षेच्या कारणावरून नागरिकांच्या रहदारी करीता बंद करण्यात आल्याने नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याने काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी व शहरातील व्यापारी मंडळाने खासदार प्रतिभा धानोरकर यांना निवेदन देऊन समस्या मार्गी काढण्याची विनंती केली होती. नागरिकांच्या समस्या लक्षात घेत खासदार धानोरकर यांनी जिल्हाधिकारी विनयकुमार गौडा वेकोलीचे मुख्य महाप्रबंधक आभासचंद्र सिंग व रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन समस्या मार्गी लावल्या गेल्या अनेक दिवसापासून लोखंडी पुलाच्या दुरुस्ती कामाला सुरुवात झाली असून लवकरच नवीन वर्षात लोखंडी पूल नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे.