ट्रक व दुचाकीच्या अपघातात दुचाकी चालकांचा पाय मोडला
राजीव रतन चौकनागरिकांसाठी जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागते
घुग्घूस : येथील राजिव रतन रेलवे गेट क्रमांक 39 येथे रेल्वे उड्डाणपुलाचे कार्य शुरु असून सतत बंद होत असलेल्या रेल्वे गेटमुळे याठिकाणी दररोज वाहतूकीची कोंडी निर्माण होत असते. एकेरी मार्गामुळे वाहनाचे दररोज अपघात होत असतात.
या रेल्वे गेट वरील उड्डाणपूलाचे कासवगतीने चालणारे काम घुग्घुस वासियासाठी धोकादायक व अपघातग्रस्त ठरले आहेत.
चंद्रपूर वणी मार्गावर राजीव रतन चौक येथील रेल्वे क्रॉसिंग गेट क्रं 39 हा दिवसातून जवळपास पंधरा ते वीस वेळा बंद पडत असतो याठिकाणी गेल्या तीन वर्षांपासून आर.के.मदानी या कंपनीच्या वतीने रेल्वे उड्डाणपूलाचे कार्य शुरु आहे, हे काम कासव गतीने शुरु असल्यामुळे वेकोलिच्या कॉलनीत राहणाऱ्या व अन्य जिल्ह्यांतील येणाऱ्या नागरिकांचे जीवन नरकीय झालेले आहेत,वस्ती आणि कॉलनीला जोडणारा लोखंडी पूल बंद असल्याने दुचाकी वाहन धारकांना या रस्त्या शिवाय दुसरा पर्यायच उरलेला नाही.
या एकेरी मार्गावर नादुरुस्त ओव्हरलोड जड वाहतुकी मुख्यमार्गेवर तिन ते चार तास उभे असल्याने वाहतूकीची कोंडी निर्माण झाले, या मार्गावर जड वाहनांना दिवसा प्रवेश बंद प्रतिबंधित क्षेत्र करण्यात यावे, वाहतूकीची कोंडी असल्याने शालेय शिक्षण विद्यार्थीनींना खूप नाहक त्रास होत असते रेलवे गेट बंद व जडवाहतूकीमुळे व रुग्णवाहिका रुग्णांना आपला जिवमुठीत व गमवावा लागते मात्र या ठिकाणी दररोज ओव्हरलोडमुळे अपघात होत राहते.
स्थानिक नागरिकांनी व सामाजिक कार्यकर्तांकडून पोलीस अधीक्षक यांना मागणी करण्यात येत आहे जो पर्यंत पुलाच्या पूर्ण निर्माण बाधकाम होत नाही, ओव्हरलोड ट्रकांना प्रतिबंधित क्षेत्र करण्यात यावे, अशी मागणी या ठिकाणी नागरिकांनी केली आहे.